इराणी वस्तीत पोलिसांवरील दगडफेक प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
By मुरलीधर भवार | Updated: September 1, 2023 18:31 IST2023-09-01T18:30:51+5:302023-09-01T18:31:04+5:30
या प्रकरणी कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्यात १५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इराणी वस्तीत पोलिसांवरील दगडफेक प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
कल्याण-आंबिवली येथील इराणी वस्तीत चोरट्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर महिला पुरुषांनी पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली होती. या प्रकरणी कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्यात १५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये महिला पुरुषांचा समावेश आहे.
फिरोज खान उर्फ फिरोज इराणी याने अंधेरी येथील माणसाला गंडा घातला होता. या गुन्हयात त्याठिकाणी तक्रार दाखल होती. पोलिसानी या गुन्ह्यातील आरोपी फिरोज हा हवा होता. तो इराणी वस्तीत लपून बसला असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. अंधेरी डीएन नगर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरिक्षक राकेश पवार, पोलिस उपनिरिक्षक महेश नाकयवडी यांच्या पथकाने आंबिवली गाढले. त्याठिकाणी सापळा रचला. त्या वस्तीत आधी बुरखाधारी महिला पोलिसाला पाठविले.
मात्र पोलिसांच्या सापळयाची कुणकुण लागताच सलूनमध्ये दाढी करीत बसलेला फिरोज त्याठिकाणी पळ काढण्याच्या बेतात होता. फिरोजच्या नातेवाईकानी पोलिसांच्या कारवाई पथकावर दगडफेक केली. या प्रकरणी पोलीस विजय दुगाने यानी दिलेल्या फिर्यादीनुसार इराणी वस्तीतील १५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.