आनंद परांजपे यांच्या विरोधात चार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By मुरलीधर भवार | Updated: December 24, 2022 20:50 IST2022-12-24T20:50:02+5:302022-12-24T20:50:11+5:30

कल्याण-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या विरोधात कल्याण डोंबिवलीतील चार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

A case has been registered against Anand Paranjape in four police stations | आनंद परांजपे यांच्या विरोधात चार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

आनंद परांजपे यांच्या विरोधात चार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कल्याण-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या विरोधात कल्याण डोंबिवलीतील चार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अपशब्दाचा वापर केला होता. या घटनेच्या निषेषार्थ बाळासाहेबांची शिवसेना आक्रमक झाली. बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाकडून परांजपे यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी विविध पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. कल्याणमधील बाजारपेठ आणि कोळसेवाडी तर डोंबिवलीतील रामनगर आणि मानपाडा या चार पोलिस ठाण्यात परांजपे यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परांजपे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी राजेश कदम, महेश गायकवाड, रवी पाटील आणि छाया वाघमारे आदींनी मागणी केली होती.

Web Title: A case has been registered against Anand Paranjape in four police stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण