कल्याणमध्ये पार पडली सौंदर्य स्पर्धा
By मुरलीधर भवार | Updated: June 6, 2024 17:07 IST2024-06-06T17:07:40+5:302024-06-06T17:07:50+5:30
महाराष्ट्र श्रावणी २०२३ विजेत्या शालिनी सरपेस, नेहा वाघमारे, रश्मीता चित्रे,श्वेता सुरेश यांनी स्पर्धेचे परिक्षक म्हणून काम पाहिले.

कल्याणमध्ये पार पडली सौंदर्य स्पर्धा
कल्याण-कल्याणमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सौंदर्य स्पर्धेत मिस विभागात पहिला क्रमांक निकिता घारे, प्रथम उपविजेता आफशा फातिमा आणि द्वितीय उपविजेता स्नेहा यादव हिने पटकावला. तसेच मिसेस विभागात पहिला क्रमांक श्रिया शिरवळकर, प्रथम उपविजेता डॉ. सिद्धी रायबोले तर द्वितीय उपविजेता केडीएमसीच्या कर्मचारी रुपाली तावरे हिने पटकावला.
महाराष्ट्र श्रावणी २०२३ विजेत्या शालिनी सरपेस, नेहा वाघमारे, रश्मीता चित्रे,श्वेता सुरेश यांनी स्पर्धेचे परिक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेआधी स्टार किड्स हा लहान मुलांसाठी असलेला फॅशन रनवे शो देखील संपन्न झाला, त्यात ५० हुन अधीक मुलांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत यश पटकविणाऱ््या तरुणींना अभिनय आणि मॉडेलिंगच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. येत्या ऑगस्ट महिन्यात राज्यस्तरीय सौंदर्यस्पर्धा होणार आहे असे आयोजकांनी सांगितले.