चिमुकलीसोबत अश्लील चाळे; नराधम गजाआड, डोंबिवलीमधील घटना

By प्रशांत माने | Updated: May 9, 2023 15:20 IST2023-05-09T15:20:22+5:302023-05-09T15:20:34+5:30

पुर्वेकडील परिसरात पिडीत मुलगी कुटुंबासह राहते. शुक्रवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास पिडीत मुलीची आई घराबाहेर गेली होती.

A 22-year-old accused who sexually assaulted a six-year-old girl has been arrested in Dombivli. | चिमुकलीसोबत अश्लील चाळे; नराधम गजाआड, डोंबिवलीमधील घटना

चिमुकलीसोबत अश्लील चाळे; नराधम गजाआड, डोंबिवलीमधील घटना

डोंबिवली: सहा वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लील चाळे करणा-या २२ वर्षीय नराधमाला रामनगर पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. आरोपी हा पिडीतेच्या समोरच राहणारा असून मजूरीचे काम करतो. तो मुळचा उत्तरप्रदेशचा रहिवासी आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे. संबंधित नराधमाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

पुर्वेकडील परिसरात पिडीत मुलगी कुटुंबासह राहते. शुक्रवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास पिडीत मुलीची आई घराबाहेर गेली होती. त्यावेळी पिडीत मुलगी आणी तीचा भाऊ अंगणात खेळत होते. तेव्हा समोर राहणा-या २२ वर्षीय आरोपीची नजर मुलीवर पडली. तीची आई बाहेरी गेल्याची संधी साधत त्याने मुलीला आपल्या घरी नेले आणि तिच्यासोबत अश्लील चाळे केले. दरम्यान त्या कालावधीत पिडीेतेच्या भावाने हा प्रकार आईला जाऊन सांगितला. तीची आई घरी आली असता समोरच्या घराचा दरवाजा बंद अवस्थेत होता.

दरवाजा ठोठावला असता मुलीने तो रडतच उघडला. त्यानंतर आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तीने घडलेला प्रकार सांगितला. तीच्या भावाला नराधमाने शिवीगाळी करीत हाकलून लावल्याचे आणि नंतर तीला घरात नेऊन तीच्याशी अश्लील चाळे केल्याकडे तीने लक्ष वेधले. दरम्यान पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.

Web Title: A 22-year-old accused who sexually assaulted a six-year-old girl has been arrested in Dombivli.