रेल्वेच्या ओव्हरहेड वायरचा शॉक लागल्याने १३ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी
By मुरलीधर भवार | Updated: January 31, 2024 18:02 IST2024-01-31T17:58:41+5:302024-01-31T18:02:24+5:30
कल्याण पूर्व खडेगोळवली परिसरात समीर बेग हा १३ वर्षाचा मुलगा आपल्या कुटुंबासह राहतो.

रेल्वेच्या ओव्हरहेड वायरचा शॉक लागल्याने १३ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी
कल्याण- रेल्वेच्या ओव्हरहेडवायरचा शॉक लागल्याने १३ वर्षे मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना कल्याण पूर्व रेल्वे यार्ड परिसरात घडली. समीर बेग असे जखमी मुलाचे नाव आहे. यार्डात खेळताना तो मालगाडीवर चढला, मालगाडीच्या टपावरून त्याचा हात रेल्वे ओव्हरहेड वायरला लागल्यामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे . या घटनेची कल्याण रेल्वे पोलिसांनी नोंद केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
कल्याण पूर्व खडेगोळवली परिसरात समीर बेग हा १३ वर्षाचा मुलगा आपल्या कुटुंबासह राहतो. काल दुपारी समीर शाळेतून आल्यानंतर त्याने त्याच्या आईला मी कबड्डी खेळायला चाललोय असे सांगितले. समीर कल्याण पूर्वेकडील रेल्वे यार्डात गेला. त्याठिकाणी मालगाडीवर चढला. मालगाडीच्या टपावर उभा असताना त्याचा हात रेल्वे ओव्हरहेड वायरला लागला असावा त्यामुळे समीरला जोरदार झटका बसला, घटनेच्या माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ समीरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेत समीर सुमारे ७० ते ८० टक्के भाजला आहे. त्याच्यावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचे प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.