शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील 99 वर्षांच्या अवलियाची कमाल; संस्कृत भाषेतील चारही वेदांचे केले मराठी भाषांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 21:14 IST

केईएम रुग्णालयातून प्रोफेसर म्हणून निवृत्त झाल्यानंतर डॉ.  भीमराव कुलकर्णी यांनी 1996 पासून वेदांच्या अनुवादाला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी 6 वर्षे माहिती गोळा करण्याबरोबरच प्रचंड वाचनही केले.

लोकमत  न्यूज नेटवर्क 

कल्याण : आपल्याकडे सर्वोच्च स्थान असणाऱ्या चारही वेदांचे डोंबिवलीच्या या अवलियाने मराठीत भाषांतर केले आहे. ते ही वयाच्या अवघ्या 99 व्या वर्षी आणि कोरोनाला हरवून. होय हे खरं आहे डोंबिवलीला राज्याची सांस्कृतिक उपराजधानी म्हटलं जात ते उगाच नाही. डोंबिवली शहराने आजवर अनेक कर्तृत्ववान व्यक्ती दिल्या आहेत.  या व्यक्तींमध्ये आणखीन एका नावाची भर पडली आहे.  डोंबिवलीतील डॉ. भीमराव कुलकर्णी यांनी आपल्या गुरूच्या आज्ञेचे पालन करत संस्कृतमधील चारही वेदांचे टिप्पणीसह अनुवाद केले आहेत.  आपल्या गौरवशाली आणि प्रतिभासंपन्न संस्कृतीची ओळख असणारे चारही वेद, संस्कृत उपनिषदे आणि वाङमयाचे मराठीत अनुवाद करून हा सर्व ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहचण्याच्या ध्यासातून डॉ. कुलकर्णी यांनी हा विस्मयकारी प्रपंच मांडला आहे. (translation of Vedas in Marathi by Dr. Bhimrao Kulkarni of Dombivali. )

     केईएम रुग्णालयातून प्रोफेसर म्हणून निवृत्त झाल्यानंतर डॉ.  भीमराव कुलकर्णी यांनी 1996 पासून वेदांच्या अनुवादाला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी 6 वर्षे माहिती गोळा करण्याबरोबरच प्रचंड वाचनही केले.  त्यांचे यजुर्वेद आणि ऋग्वेद हे दोन्ही मराठीतील ग्रंथ प्रसिद्ध झाले असून सामवेद आणि अथर्ववेद या ग्रंथाचे अनुवाद पूर्ण झाले आहेत. कोरोनाकाळात प्रिंटिंग बंद असल्याने या ग्रंथाची छपाई थांबली आहे. मात्र ठाण्यातील दाजी पणशीकर यांनी या ग्रंथाच्या पब्लिशिंगची जबाबदारी स्वीकारली आहे. यंदाच्या 18 मे रोजी 99 व्या वर्षात पदार्पण केलेल्या डॉ. कुलकर्णी यांना महाराष्ट्र सरकारने वेद विद्या विशारद पुरस्कारानेही सन्मानीत केले आहे. 

        शाळांमधून संस्कृतचे शिक्षणच बंद झाल्याने आपल्या गौरवशाली आणि प्रतिभासंपन्न संस्कृतीचे ज्ञान देणारे हे वाङमय काळाच्या ओघात लुप्त होण्याची भीती त्यांना वाटत आहे. आजच्या पिढीला संस्कृत वाचता येत नसल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे.  शालेय जीवनापासूनच  संस्कृत विषय सुरू करण्याची त्यांची मागणी आहे. ज्यामुळे संस्कृत वाङमय नव्या पिढीला आत्मसात करणे सोयीचे होईल

टॅग्स :dombivaliडोंबिवली