शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

66 कोटी खर्चून केलेला रस्ता पुन्हा खोदला; मनसेनं मुख्यमंत्र्यांना दाखवला अंधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 18:25 IST

विशेष म्हणजे ६६ कोटी रुपये खर्चून हा रस्ता बांधण्यात आला होता. त्यावरुन, राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. 

ठाणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यात जरी सलोख्याचे संबंध असले तरी स्थानिक पातळीवर ठाण्यातील मनसैनिक आणि शिवसेना शिंदे गटातील नेत्यांमध्ये धुसफूस सुरूच असल्याचे दिसून येते. मनसेचे एकमेव आमदार असलेल्या राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना स्थानिक नेत्यांकडे लक्ष देण्याचं आवाहन केलंय. तसेच, दिव्यातील स्थानिक नगरसेवक आपणास चुकीची माहिती देत आहेत, असेही त्यांनी म्हटलंय. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन झालेला रस्ता खोदण्यात आला. विशेष म्हणजे ६६ कोटी रुपये खर्चून हा रस्ता बांधण्यात आला होता. त्यावरुन, राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. 

मुख्यमंत्री साहेब, ७ जूनला दिवा येथील जो रस्ता आपल्या हस्ते जनतेसाठी खुला झाला, त्याच रस्त्याखालच्या नवीन जलवाहिनीला व्हॉल्व्ह लावले नाहीत. म्हणून आता तो पुन्हा खोदला जात आहे. या रस्त्यावर खर्च झालेले ६६ कोटी रुपये हे  कोणाच्या घरचे नाहीत तर जनतेने घाम गाळून कमावलेले आहेत याची जाणीव आपणांसही असेलच, असे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच, आपण लोकार्पण केलेल्या दिवा-आगासन रस्ता व नवीन जलवाहिनीची कामं अजून पूर्णच झाली नाहीत. आपणांस दिव्यातील तुमचे माजी नगरसेवक व पदाधिकारी अंधारात ठेवत आहेत, यावर आम्ही काहीही केले तरी आपल्या समर्थकांना व आपल्या लाडक्या लोकप्रतिनिधीला त्यात राजकारण दिसते. म्हणून माझी आपणांस विनंती आहे की दिवा विभागात राहणाऱ्या सुमारे ४ लाख नागरीकांसाठी एकदा तटस्थपणे आढावा घ्या, आपणांस दिव्यातला अंधार दिसेल, अशा शब्दात आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. तसेच, दिव्यातील रस्त्याच्या खोदकामाचे फोटोही ट्विटवरुन शेअर केले आहेत. 

दरम्यान, राज्यात शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात सातत्याने वाद होताना दिसत आहे. तर, एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोघेही सोडत नाहीत. मात्र, मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे आणि मुख्यमंत्र्यांच्या अनेकदा गाठीभेट होत असून अनेक कार्यक्रमात दोघे एकत्र आल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं. त्यामुळे, शिंदे गट आणि राज ठाकरे यांच्यातील सौख्य हे दोन्ही पक्षातील संभाव्य युतीचे संकेत असल्याचंही काहीजण चर्चा करतात. मात्र, मुंबई आणि ठाण्यातील स्थानिक परिस्थिती वेगळी असल्याचे दिसून येते.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMNSमनसेthaneठाणेkalyanकल्याण