कल्याण परिमंडलातील ५३ उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांचा पुरस्काराने गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 02:57 PM2024-05-01T14:57:14+5:302024-05-01T14:57:25+5:30

सन २०२३-२४ या वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

53 outstanding technical employees of Kalyan Parimandal were felicitated with awards | कल्याण परिमंडलातील ५३ उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांचा पुरस्काराने गौरव

कल्याण परिमंडलातील ५३ उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांचा पुरस्काराने गौरव

डोंबिवली : महावितरणच्या कल्याण परिमंडल कार्यालयात बुधवारी महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा झाला. मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर जागतिक कामगार दिनानिमित्त वर्षभरात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या ५३ उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले.

सन २०२३-२४ या वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. मुख्य अभियंता औंढेकर यांनी तांत्रिक कर्मचारी हे महावितरणच्या प्रगतीचे शिल्पकार असल्याचे नमूद करत अधिक जोमाने काम करून नवनवीन यशोशिखरे पादाक्रांत करण्याबाबत कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी महाव्यवस्थापक अनिल बऱ्हाटे, अधीक्षक अभियंता दीपक पाटील, निलकमल चौधरी, महेश अचिंनमाने, सहायक महाव्यवस्थापक धैर्यशिल गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, कार्यकारी अभियंता कौमुदी परदेशी, नरेंद्र धवड, वरिष्ठ व्यवस्थापक निलेश भवर, शशिकांत पोफळीकर, पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांसह अभियंते, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता स्मीता काळे यांनी केले. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अहिर यांनी आभार मानले.

पुरस्कार प्राप्त कर्मचारी
कल्याण मंडल एक – जनार्दन पानसरे, सुहास ढमणे, विश्वनाथ माळी, सुभाष चौधरी, सतिश म्हात्रे, सुशिल श्रीखंडे, असद पठाण, अतुल मेडपल्लीवार, लक्ष्मण हिंदोळा, भास्कर पारधी, ज्युड फर्नांडीस, संजय गवाळे, भारती तळोजेकर, बाजीराव पवार.
कल्याण मंडल दोन – विष्णु धिर्डे, उमेश भारती, विशाल पाटील, विशाल पावशे, नामदेव पवार, प्रितम गुंजाटे, विठ्ठल माठे, एकनाथ लखाडे, जगन्नाथ तुपे, कमलेश महाजन, संदिप बऱ्हाटे, शिवाजी लिहे, बळीराम हायलिंगे, नागनाथ लोकरे, रामदास मोटे, दिनेश राऊत.
वसई मंडल – शशिकांत सागर, अर्जुन गोवारी, रोहित भट, मधुकर घरत, मनोज शेंडे, सचिन जाधव, यतिन कोरे, विशाल राऊत, रोहन महाले, दिनकर खांडवी, अजित गिंभल, प्रकाश मुकने, राजकुमार शेंडे.
पालघर मंडल – हेमंत धर्ममेहेर, मुदस्सर खलिफा, अल्पेश वर्तक, दिनेश संखे, ज्ञानेश्वर गवळे, विठ्ठल निखाडे, चंद्रकांत वायेडा, सुनिल पाटील, रघुनाथ गायकवाड, अर्जुन सावंत.

Web Title: 53 outstanding technical employees of Kalyan Parimandal were felicitated with awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.