48 minutes of non-stop 92 yogas on ice; World record set by Dombivli | बर्फावर 48 मिनिटे नॉनस्टॉप 92 योगासने; डोंबिवलीच्या श्रेयाने केला जागतिक  विक्रम 

बर्फावर 48 मिनिटे नॉनस्टॉप 92 योगासने; डोंबिवलीच्या श्रेयाने केला जागतिक  विक्रम 

डोंबिवली : डोंबिवलीच्या  वैभव हरिहरनने सीए  च्या परीक्षेत देशातून दुसरा क्रमांक प्राप्त करत डोंबिवलीचे नाव उंचावले होते. आता डोंबिवलीमधील श्रेया महादेव शिंदे हिने डोंबिवलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.  मॉडेल इंग्लिश स्कूलच्या श्रेयाने बर्फावर नॉनस्टॉप तब्बल 48 मिनिट 38 सेकंदात 92 योगासने करत नविन जागतिक विक्रमाला गसवणी घातली आहे. या यशामुळे तिच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. 
           
          श्रेया दहा वर्षाची असल्यापासून योगा कडे आकर्षित झाली. तसेच तिने अनेक स्पर्धांमधून पदकंही पटकावली असल्याची माहिती मॉडेल शाळेच्या योगाशिक्षका मेघा हर्षद परब यांनी दिली.श्रेयाची आई वंदना शिंदे आणि बहिण श्रुती शिंदे यांनी देखील विशेष परिश्रम घेत श्रेयाकडून सराव करून घेतला आहे.श्रेयाच्या विक्रमाची अखिल भारतीय योगा महासंघाने (ABYM) 'योगा रेकॉर्ड बुक'मध्ये नोंद केली आहे.

Web Title: 48 minutes of non-stop 92 yogas on ice; World record set by Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.