स्मार्ट सिटीच्या सीसी कॅमेऱ्यांत ३७२ बेशिस्त डोंबिवलीकर वाहनचालक कैद

By अनिकेत घमंडी | Updated: August 31, 2023 19:24 IST2023-08-31T19:23:52+5:302023-08-31T19:24:40+5:30

महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी कंट्रोल रूममधून ही कारवाई सुरू आहे.

372 unruly Dombivlikar drivers caught in Smart City's CC cameras | स्मार्ट सिटीच्या सीसी कॅमेऱ्यांत ३७२ बेशिस्त डोंबिवलीकर वाहनचालक कैद

स्मार्ट सिटीच्या सीसी कॅमेऱ्यांत ३७२ बेशिस्त डोंबिवलीकर वाहनचालक कैद

 डोंबिवली : पश्चिम मच्छी मार्केट जवळील रेल्वे स्टेशन प्रवेशशद्वारासमोर महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत लवण्यात आलेल्या सीसी कॅमेऱ्यांव्दारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३७२ बेशिस्त डोंबिवलीकर वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. ६ जुलै ते ३१ ऑगस्ट यादरम्यान डोंबिवली पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात हे बेशिस्त वाहनचालक सीसी कॅमेऱ्यात आढळून आले, त्याद्वारे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी गुरुवारी दिली. 

महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी कंट्रोल रूममधून ही कारवाई सुरू आहे. वाहनचालकांनी मोटार वाहन नियमांचे काटेकोर पालन करावे. रेल्वे स्टेशन परिसर वाहतूक कोंडी मुक्त ठेवण्यासाठी वाहतूक विभागाला सहकार्य करावे असे आवाहन गित्ते यांनी केले.

Web Title: 372 unruly Dombivlikar drivers caught in Smart City's CC cameras