शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

कल्याण लोकसभा मतदार संघात २८ उमेदवार रिंगणात; दोन जणांनी घेतली माघार

By मुरलीधर भवार | Updated: May 6, 2024 19:41 IST

खरी लढत शिंदे सेना विरुद्ध उद्धव सेना

कल्याण - कल्याण लोकसभा मतदार संघात एकूण ३४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी चार जणांचे उमेदवारी अर्ज बाद झाले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३० पैकी दोन अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणूकीच्या रिंगणात २८ उमेदवार आहेत. त्यपैकी खरी लढत शिंदे सेना विरुद्ध उद्धव सेना अशी आहे. 

उद्धव सेनेचे पदाधिकारी आणि माजी महापौर रमेश जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरेकर यांचा उमेदवारी अर्जात त्रूटी निघाल्यास पर्यायी उमेदवारी असावा यासाठी जाधव यांनी अर्ज दाखल केला होता. दरेकर आणि जाधव या दोघांचे अर्ज वैध झाले होते. त्यामुळे जाधव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्याचबरोबर वंचित तर्फे जमीन खान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी दिली गेली नसल्याने त्यांनीही उमेदवारी मागे घेतली आहे. कल्याण लोकसभा मतदार संघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र  खासदार श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा महायुतीतर्फे निवडणूकीच्या रिंगणात आहे. 

त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे उद्धव सेनेच्या उमेदवार वैशाली देरकर या रिंगणात आहे. खरी लढत शिंदे सेना विरुद्ध उद्धव सेना अशी होणार आहे. या मतदार संघात बिग बॉस फेम अभिजीत बिचकुले हे देखील अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे. बसपाचे प्रशांत इंगळे, राईट टु रिकॉल पार्टीचे अमित उपाध्याय, राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अरुण निटूरे, अपनी प्रजाहित पार्टीचे प्रवीण गवळी, बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टीच्या पूनम बैसाणे, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) चे श्रीकांत शिवाजी वंजारे, भीमसेनेचे श्रीधर साळवे, वंचित बहुजन आघाडीचे मोहम्मद शेख सुलेमानी ठाकूर, बहुजन समाज पार्टी (आंबेडकर) च्या सुशिला कांबळे, संयुक्त भारत पक्षाचे संभाजी जाधव, राष्ट्रीय मराठा पार्टीचे हिंदूराव पाटील, अपक्ष उमेदवार अजय मोर्या, अमरीष मोरजकर, अरुण जाधव, अश्वीनी केंद्रे, नफिस अन्सारी, प्राजक्ता येवले, मोहम्मद खान, राकेश जैन, शिवा अय्यर, डॉ.सचिन पाटील, सलीमउद्दीन खान, हितेश जेसवानी, ज्ञानेश्वर लोखंडे हे रिंगणात आहेत. 

टॅग्स :kalyanकल्याणShrikant Shindeश्रीकांत शिंदेvaishali darekarवैशाली दरेकरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४