अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला वीस वर्षे कारावास; कल्याण न्यायालयाचा निकाल
By सचिन सागरे | Updated: April 8, 2024 19:36 IST2024-04-08T19:34:32+5:302024-04-08T19:36:03+5:30
खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला सन २०१९ मध्ये आपल्या एका नातेवाईकाच्या घरी आरोपी दीपक घेऊन गेला.

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला वीस वर्षे कारावास; कल्याण न्यायालयाचा निकाल
कल्याण: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दिपक उर्फ गबरू शशिकांत सोनवणे (२१) याला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. पी. आर. अष्टूरकर यांनी पोक्सो कलमांतर्गत दोषी ठरवत वीस वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला सन २०१९ मध्ये आपल्या एका नातेवाईकाच्या घरी आरोपी दीपक घेऊन गेला. त्याठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी दीपकविरोधात गुन्हा दाखल केला. तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक एस. एफ. कदम यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सरकारी वकील सचिन कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले. त्यांना कोर्ट पैरवी सहायक पोलिस उपनिरीक्षक नितीन सावंत यांनी मदत केली.