उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना १६ हजार दिवाळी सानुग्रह अनुदान 

By सदानंद नाईक | Updated: November 1, 2023 19:33 IST2023-11-01T19:33:16+5:302023-11-01T19:33:56+5:30

आयुक्तांच्या निर्णयाने कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे. 

16 thousand Diwali grant to Ulhasnagar municipal employees | उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना १६ हजार दिवाळी सानुग्रह अनुदान 

उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना १६ हजार दिवाळी सानुग्रह अनुदान 

उल्हासनगर : महापालिका सभागृहात आयुक्त अजीज शेख व कामगार संघटनेच्या नेत्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर १६ हजार ५०० दिवाळी सानुग्रह अनुदान एकाच टप्प्यात देण्याचे आयुक्तांनी जाहीर केले. आयुक्तांच्या निर्णयाने कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे. 

उल्हासनगर महापालिकेची आर्थिकस्थिती खालावली असतांनाही आयुक्त अजीज शेख यांनी कामगार संघटना नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड जाण्यासाठी १६ हजार ५०० रुपये दिवाळी (बोनस) सानुग्रह अनुदान घोषित केले. दिवाळी सानुग्रह अनुदान बैठकीला उपायुक्त अशोक नाईकवाडे, लेखा अधिकारी किरण भिलारे यांच्यासह कामगार संघटनेचे नेते उपस्थित होते.

महापालिकेत एकून २१०० कामगार असून दिवाळी बोनस निमित्त महापालिकेवर साडे तीन कोटीचा बोजा पडणार आहे. एकीकडे महापालिका कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस जाहीर झाल्यानंतर, दुसरीकडे ठेकेदारांनीही दिवाळी गोड जाण्यासाठी थकीत बिलाची मागणी करणार आहेत. दिवाळीपूर्वी एका टप्प्यात दिवाळी बोनस देण्याचें आयुक्तांनी जाहीर केले.
 

Web Title: 16 thousand Diwali grant to Ulhasnagar municipal employees