Pro Kabaddi League schedule : पुन्हा घुमणार कबड्डी... कबड्डी... चा गजर; 'ट्रिपल हेडर, ट्रिपल पंगा', अशी मेजवानी मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 11:49 AM2021-12-16T11:49:59+5:302021-12-16T11:50:50+5:30

Pro Kabaddi League schedule : कोरोना व्हायरसच्या संकटात स्थगित करण्यात आलेली प्रो कबड्डी लीग एका वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Pro Kabaddi League announced the schedule of the first half for Season 8 that will begin from December 22nd, 2021 | Pro Kabaddi League schedule : पुन्हा घुमणार कबड्डी... कबड्डी... चा गजर; 'ट्रिपल हेडर, ट्रिपल पंगा', अशी मेजवानी मिळणार

Pro Kabaddi League schedule : पुन्हा घुमणार कबड्डी... कबड्डी... चा गजर; 'ट्रिपल हेडर, ट्रिपल पंगा', अशी मेजवानी मिळणार

Next

Pro Kabaddi League schedule : कोरोना व्हायरसच्या संकटात स्थगित करण्यात आलेली प्रो कबड्डी लीग एका वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे कबड्डी चाहत्यांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. आयोजक मशाल स्पोर्ट्स यांनी प्रो कबड्डी लीगच्या ८व्या पर्वाच्या पहिल्य टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले. २२ डिसेंबर २०२१पासून हे पर्व  सुरू होणार असून बंगलोर येथे सर्व सामने खेळवण्यात येणार आहेत.

यंदाच्या पर्वाची सुरुवात एकदम दणक्यात होणार आहे. पहिल्या चार दिवसांत ‘Triple Headers’ असे सामने होतील, तर शनिवारी ‘Triple Panga’ रंगणार आहे. यू मुंबा आणि बंगळुरू बुल्स यांच्या लढतीनं प्रो कबड्डीच्या ८व्या पर्वाला सुरुवात होणार. त्यानंतर तेलुगु टायटन्स विरुद्ध तामिळ थलाव्हाज असा दक्षिण डर्बीचा सामना रंगणार आहे.  यूपी योद्धा समोर गतविजेत्या बंगाल वॉरियर्स यांचे आव्हान असणार आहे. हा सर्व मसाला स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी चाखता येणार आहे.     

२०१४मध्ये सुरुवात झालेल्या पो कबड्डीचे सातपर्व झाले आहेत. पहिल्या पर्वात जयपूर पिंक पँथर्सनं जेतेपद पटकावले होते. त्यानंतर २०१५मध्ये यू मुम्बाने तर पुढील तीन पर्वात पाटना पायरेट्सनं जेतेपदं पटकावली. २०१८ व २०१९मध्ये अनुक्रमे बंगळुरू बुल्स व बंगाल वॉरियर्स यांनी बाजी मारली.   

Web Title: Pro Kabaddi League announced the schedule of the first half for Season 8 that will begin from December 22nd, 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.