शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

आमदार चषक कबड्डी स्पर्धा : भारत पेट्रोलियमला अजिंक्यपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 19:05 IST

शेवटच्या चढाईवर आकाशाने २ बळी मिळवत पेट्रोलियमला २८-२० असे विजयी केले. 

ठळक मुद्देमध्य रेल्वेवर २८-२० असा विजय मिळवत जतेपदाला गवसणी घातली.

मुंबई : भारत पेट्रोलियमने अपेक्षेनुसार आमदार चषक कबड्डी स्पर्धा जिंकताना एका फारशा न रंगलेल्या लढतीमध्ये मध्य रेल्वेचा २८-२० असा चांगल्या फरकाने पराभव केला आणि रुपये दीड लाखाचा पुरस्कार हस्तगत केला. अंतिम लढतीत, खास करून पूर्वार्धात जो एक-दोन चकमकी सोडता सावध खेळ झाला. त्यामुळे प्रेक्षकांना मन:पूर्वक आनंद लुटता आला नाही हे निश्चित. मध्यंतराला विजयी संघाकडे ११-१० अशी नाममात्र आघाडी  होती. याआधी ज्या उपांत्य लढती झाल्या त्यात पेट्रोलियन संघाने बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप (पुणे) यांचा २५-२० असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात रेल्वेने राज्य पोलिसांवर ३५-३७ अशी मात केली. उपविजयी आणि उपांत्य पेâरीत पराभूत  संघांना अनुक्रमे १ लाख आणि प्रत्येकी ५१ हजारांचा पुरस्कार प्राप्त झाला.

अंतिम पेâरीची लढत म्हटले की दोन्ही संघांवर तणाव व तो सुरुवातीपासूनच जाणवत होता. श्रीकांत जाधवने रेल्वेकडून खाते खोलले पण त्याला विशाल मानेने बाद केले व पाठोपाठ पेट्रोलियमच्या काशीलिंगला गणेश बोडकेने ‘डॅश’ मारत बाहेर पेâकले.३-३ अशी स्थिती तेव्हा झाली. दोन्हीकडून १-१ गुण घेण्यापलिकडे फारसे काही नव्हते. साधारणपणे १३ मिनिटांत गुणफलक ६-६ असा बरोबरीत होता. त्यानंतर श्रीकांतने निलेश शिंदे आणि गिरीश इरनाक यांच्या तावडीतून सुटका करून घेत रेल्वेला ९-६ अशी तीन गुणांची आघाडी मिळवून दिली. मध्यंतराला पेट्रोलियमकडे ११-१० अशी १ गुणांची आघाडी होती.

उत्तरार्थातही रडाळ खेळडाची परंपरा कायम राहिली. श्रीकांत थंडावल्यानंतर रेल्वेच्या विनोद अत्याळकर याने चांगला खेळ करीत गुणांची कमाई केली. काशीलींगने रेल्वेवर लोण चढविण्याची संधी गमावली. त्याची ‘सुपर टॅकल’ झाली. १७-१६ च्या पिछाडीनंतर पेट्रोलियमच्या आकाश पिकलमुंडेने गणेश बोडकेला बाद केले. तर इरनाकने श्रीकांतचे पकड केली. पेट्रोलियमने दोन गडी बाद करीत लोण चढवला आणि रेल्वेवर २२-१७ अशी आघाडी मिळविली. लढतीच्या अखेरच्या काही मिनिटांत रेल्वेच्या श्रीकांतची तीनदा पकड झाली आणि पेट्रोलियमचा विजय निश्चित झाला. शेवटच्या चढाईवर आकाशाने २ बळी मिळवत पेट्रोलियमला २८-२० असे विजयी केले. 

टॅग्स :Kabaddiकबड्डी