शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

कबड्डी मास्टर्स : भारताची दिमाखात अंतिम फेरीत धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2018 01:41 IST

अंतिम सामन्यात जेतेपदासाठी इराणचे कडवे आव्हान; पाकिस्तान उपांत्य सामन्यात गारद

ठळक मुद्देबलाढ्य भारतीय संघाने अपेक्षित कामगिरी करताना दक्षिण कोरियाचा ३६-२० असा एकतर्फी पराभव करताना कबड्डी मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

दुबई : बलाढ्य भारतीय संघाने अपेक्षित कामगिरी करताना दक्षिण कोरियाचा ३६-२० असा एकतर्फी पराभव करताना कबड्डी मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता जेतेपदासाठी शनिवारी होणाऱ्या सामन्यात भारतापुढे झुंजार इराणचे कडवे आव्हान असेल. अन्य लढतीत इराणने पाकिस्तानचा धुव्वा उडवत दिमाखात अंतिम फेरी गाठली.

भारताविरुद्ध कोरियाची मदार पूर्णपणे जँग कुन ली याच्यावर होती. त्याने अपेक्षित खेळ केलाही, मात्र इतर खेळाडूंकडून त्याला म्हणावी तशी साथ मिळाली नाही. कर्णधार अजय ठाकूर आणि गिरिश एर्नाक यांच्या जबरदस्त खेळाच्या जोरावर भारताने मध्यंतराला १६-९ अशी मोठी आघाडी घेत सामन्याचे चित्र स्पष्ट केले. मध्यंतरानंतर कोरियाकडून थोडाफार प्रतिकार झाला खरा, परंतु कसलेल्या भारतापुढे त्यांचा निभाव लागला नाही.दुसºया सत्रात अजयसह गिरिशने आणखी भक्कम पकडी करताना कोरियाच्या आक्रमणातली हवा काढली. त्याचवेळी मोनू गोयत आणि फॉर्ममध्ये असलेल्या रिशांक देवाडिगा यांनीही खोलवर चढाया करताना कोरियाच्या बचावफळीला खिंडार पाडले. मोठी आघाडी मिळवल्यानंतरही भारताने कोरियाला कोणतीही दयामाया न दाखवताना पुनरागमनाची एकही संधी दिली नाही.

दुसरीकडे अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात इराणने शानदार बाजी मारताना अनुभवी पाकिस्तानचा ४०-२१ असा फडशा पाडला. यासह अंतिम फेरीत धडक मारलेला इराण जेतेपदासाठी भारताच्या तगड्या आव्हानास सामोरे जाईल. मध्यंतराला १९-९ अशी आघाडी घेतल्यानंतर इराणने दुसºया सत्रात आणखी वेगवान व आक्रमक खेळ करत पाकिस्तानचा सहज धुव्वा उडवला. दुसºया सत्रामध्ये पाकिस्तानकडून पुनरागमनची अपेक्षा होती. मात्र त्यांच्या चढाईपटूंकडून अत्यंत निराशाजनक कामगिरी झाली.

टॅग्स :Kabaddiकबड्डीIndiaभारतSouth Koreaदक्षिण कोरियाSportsक्रीडा