शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
5
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
6
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
7
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
8
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
9
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
10
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
11
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
12
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
13
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
14
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
15
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
16
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
17
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
18
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
19
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
20
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले

Asian Games 2018: सुवर्णपरंपरा कायम राखण्यासाठी भारतीय कबड्डीपटू सज्ज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 15:11 IST

Asian Games 2018:भारतीय कबड्डी संघाने  28 वर्ष आशियाई स्पर्धेतील आपली मक्तेदारी कायम राखली आहे. भारतीय कबड्डी संघाने आशियाई स्पर्धेत आत्तापर्यंत सर्वच्या सर्व नऊ सुवर्णपदक नावावर केली आहेत.

मुंबई - भारतीय कबड्डी संघाने  28 वर्ष आशियाई स्पर्धेतील आपली मक्तेदारी कायम राखली आहे. भारतीय कबड्डी संघाने आशियाई स्पर्धेत आत्तापर्यंत सर्वच्या सर्व नऊ सुवर्णपदक नावावर केली आहेत. त्यात पुरूषांनी 7, तर महिलांनी दोन जेतेपद पटकावली आहेत. त्यामुळे जकार्तातही ही सुवर्णपरंपरा कायम राखण्यासाठी ते सज्ज आहेत. भारतीय संघासमोर कडवे आव्हान असेल ते इराणच्या संघाचे. मागील 12 वर्षांत इराणच्या दोन्ही संघांची कामगिरी सातत्याने उंचावली आहे. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध भारताची कसोटी लागणार आहे.

आशियाई स्पर्धेला शनिवारपासून सुरूवात होत असली तरी कबड्डीचे सामने 19 ते 24 ऑगस्ट या कालावधीत होणार आहेत. भारत विरूद्ध जपान महिला संघांच्या लढतीने कबड्डीची सुरूवात होणार आहे. पुरूषांमध्ये भारताला सलामीच्या लढतीत बांगलादेशचा सामना करावा लागणार आहे. भारताच्या पुरूष व महिला संघांना अ गटात स्थान मिळाले आहे.अशी आहे गटवारीपुरूषःअ गट- भारत, बांगलादेश, दक्षिण कोरिया, थायलंड आणि श्रीलंकाब गट- इराण, पाकिस्तान, जपान, नेपाळ, इंडोनेशिया आणि मलेशियामहिलाः  अ गट- भारत, जपान, थायलंड, श्रीलंका आणि इंडोनेशियाब गट- इराण, दक्षिण कोरिया,  बांगलादेश आणि तैवान

 

भारतीय संघांची काही Interesting आकडेवारी

  • 1990 मध्ये भारतीय पुरूष संघाने बांगलादेशला नमवून पहिले सुवर्णपदक जिंकले. विशेष म्हणजे 1990च्या आशियाई स्पर्धेतील भारताचे ते एकमेव सुवर्णपदक होते.
  • भारतीय संघाने प्रत्येक आशियाई स्पर्धेत कबड्डीचे सुवर्ण नावावर कायम राखले आहे. भारताने 1994, 1998, 2002, 2006, 2010 आणि 2014 मध्ये बाजी मारली
  • भारताने 1998 मध्ये श्रीलंकेविरूद्ध 76-13 असा विजय मिळवला होता आणि आशियाई स्पर्धेत भारताने सर्वाधिक गुणांनी (63) मिळवलेला विजय आहे.
  • भारताला 2014च्या अंतिम लढतीत इराणने विजयासाठी चांगलेच झुंजवले, परंतु भारताने 2 (27-25) गुणांच्या फरकाने बाजी मारली. 
  • भारताचा माजी कर्णधार राकेश कुमार आणि माजी खेळाडू नवनीत गौतम यांच्या नावावर सर्वाधिक जेतेपद आहेत. 2006, 20010 आणि 2014च्या सुवर्णपदक विजेत्या संघाचे ते सदस्य होते. 
  • मागील चार आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय संघाने एकही सामना गमावलेला नाही.  
टॅग्स :Asian Games 2018एशियन गेम्स २०१८Kabaddiकबड्डीSportsक्रीडा