शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

कोण आहे हा YouTuber? व्हिडिओ बनवण्याासाठी उभारले शहर, खर्च केले ₹ 119 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 15:53 IST

YouTuber MrBeast : हा जगातील सर्वात मोठा YouTuber आहे.

YouTuber MrBeast : अमेरिकेत राहणारा जिमी स्टीफन डोनाल्डसन उर्फ ​​मिस्टर बीस्ट, हा जगातील सर्वात मोठा YouTuber आहे. आपल्या अनोख्या आणि भव्य-दिव्य व्हिडिओसाठी मिस्टर बीस्ट ओळखला जातो. येत्या 19 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या 'बीस्ट गेम्स' या नवीन रिॲलिटी शोची त्याने नुकतीच घोषणा केली. यासाठी त्याने टोरंटोमध्ये चक्क एक शहर उभारले आहे.

ऐकून चकीत व्हाल, पण फक्त व्हिडिओसाठी मिस्टर बीस्टने एक भव्य सेट उभारला आहे, जो एखाद्या शहरापेक्षा कमी नाही. तब्बल 14 मिलियन डॉलर्स (सुमारे 119 कोटी रुपये) खर्चून बांधलेल्या या सेटवर लवकरच स्पर्धक एकमेकांशी स्पर्धा करताना दिसणार आहेत. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या सेटचे फोटोही शेअर केले आहेत.

'बीस्ट गेम्स' शोबद्दल एका यूजरने कमेंट केली की, केवळ 25 मिनिटांच्या व्हिडिओसाठी पाण्यासारखे पैसे खर्च करणे योग्य नाही. यावर मिस्टर बीस्टने उत्तर दिले, हा केवळ 25 मिनिटांचा व्हिडिओ नाही, तर 10 भागांचा शो आहे, जो तुम्ही पुढील आठवड्यापासून Amazon Prime वर पाहणार आहे.

शो करण्यासाठी किती खर्च आला?मिस्टर बिस्टने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की, हा शो बनवण्यासाठी एकूण 100 मिलियन डॉलर (सुमारे 850 कोटी रुपये) खर्च करण्यात आला आहे. एवढंच नाही, तर आतापर्यंत 40 हून अधिक विश्वविक्रमही मिस्टर बीस्टच्या नावे नोंदवले गेले आहेत.

जगातील सर्वात मोठा youtuberजिमीच्या YouTube चॅनेलवर आतापर्यंत 335 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. या संख्येसह तो जगातील सर्वात मोठा YouTuber बनला आहे. 7 मे 1998 रोजी कॅन्ससमधील विचिटा येथे जन्मलेल्या जिमीने 'Worst Intros on YouTube' नावाचा व्हिडिओ पोस्ट केला. येथून तो लोकप्रिय झाला आणि त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. 19 फेब्रुवारी 2012 रोजी त्याने त्याचे YouTube चॅनल सुरू केले आणि 2016 पासून पूर्ण वेळ YouTuber बनण्यासाठी कॉलेजही सोडले. मिस्टर बीस्ट 2014 मध्ये ट्विटरवर आला, येथे त्याचे 31.3 मिलियन फॉलोअर्स आहेत, तर इन्स्टाग्रामवर 63.1 मिलियन लोक त्याला फॉलो करतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिस्टर बीस्टकडे $500 मिलियनची संपत्ती आहे.

टॅग्स :YouTubeयु ट्यूबJara hatkeजरा हटकेAmericaअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय