इंटरनेट आणि सोशल मीडियाचा प्रभाव आणि प्रसार वाढल्यापासून या माध्यमांमधून कमाई करण्याचे विविध पर्याय कंटेंट क्रिएटर्ससाठी खुले झाले आहेत. त्यात यूट्युबच्या माध्यमातून मिळणारे पैसे हे कंटेंट क्रिएटर्सच्या कमाईचं मोठं माध्यम आहे. एकेकाळी लोकांना युट्युबवर मोठे व्हिडीओ पाहायला आवडत असे. नंतर त्याची जागा शॉर्ट व्हिडीओंनी घेतली असून, आता शॉर्ट व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. शॉर्ट्सच्या माध्यमातून क्रिएटर्स मोठ्या प्रमाणात कमाई करत आहेत. मात्र यूट्युबवर केवळ एकच व्हिडीओ अपलोड करून कुणी कोट्यवधींची कमाई करू शकतो, असं सांगितल्यास त्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. मात्र ९ वर्षांपासून युट्युबवर अपलोड झालेल्या एका व्हिडीओने तब्बल ९ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सुमारे ९ वर्षांपूर्वी Fireplace 10 hours नावाच्या एका यूट्युब चॅनेलने चॅनेलवर अपलोड करण्यात आलेल्या १० तासांच्या एका फायरप्लेसच्या व्हिडीओच्या माध्यमातून सुमारे एक दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे ९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे हा व्हिडीओ सुमारे १० तासांचा लुपिंग व्हिडीओ होता.
लूप व्हिडीओ हा एक छोटा व्हिडीओ असतो. तसेच तो सतत चालण्यासाठी तयार केला जातो. म्हणजेच संपल्यानंतरही तो पुन्हा आपोआप सुरू होता. तसेच पाहण्यासाठी तो अनेक तासांचा व्हिडीओ तयार होतो. दरम्यान, Fireplace 10 hours नावाचा हा यूट्युब चॅनेल ९ वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता. सुमारे १० तासांच्या या व्हिडीओनंतर या चॅनेलवर एकही व्हिडीओ अपलोड करण्यात आलेला नाही. तरीही या चॅनेलचे १ लाख ११ हजार सब्स्क्रायबर्स आहेत. तसेच या एकमेव व्हिडीओला सुमारे १५ कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.
या व्हिडीओमध्ये जळणाऱ्या लाकडांचा सातत्याने चालणारा लूप आहे. तसेच त्यामधून आगीच्या पेटण्याचा आवाज येतो. हिवाळ्यामध्ये आणि नाताळाच्या आसपास हा व्हिडीओ खूप लोकप्रिय होतो. तसेच घरात एक आरामदायी वातावरण निर्माण करण्यासाठी हा व्हिडीओ वारंवार पाहिला जातो.
Web Summary : A ten-hour fireplace video, uploaded nine years ago, has generated $1 million on YouTube. The looping video, popular during winter and Christmas, creates a cozy ambiance. The channel has 111,000 subscribers and 150 million views.
Web Summary : नौ साल पहले अपलोड किए गए दस घंटे के फायरप्लेस वीडियो ने YouTube पर 1 मिलियन डॉलर कमाए। लूपिंग वीडियो, जो सर्दियों और क्रिसमस के दौरान लोकप्रिय है, आरामदायक माहौल बनाता है। चैनल के 111,000 सब्सक्राइबर और 150 मिलियन व्यूज हैं।