शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

... म्हणून हॉटेलमध्ये जेवणानंतर फिंगर बाउल येतो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 13:03 IST

आपण जेव्हा हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी जातो. त्यावेळी जेवण झाल्यावर हात धुण्यासाठी एका भांड्यामध्ये लिंबाची फोड आणि कोमट पाणी दिले जाते. ज्याला फिंगर बाउल म्हटलं जातं.

आपण जेव्हा हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी जातो. त्यावेळी जेवण झाल्यावर हात धुण्यासाठी एका भांड्यामध्ये लिंबाची फोड आणि कोमट पाणी दिले जाते. ज्याला फिंगर बाउल म्हटलं जातं. पण तुम्ही विचार केलाय का? हात धुण्यासाठी बसल्या जागेवर फिंगर बाउल का देण्यात येतो? जाणून घेऊयात फिंगर बाउलची कहाणी आणि त्याचा योग्य वापर कसा करावा याबाबत...

फिंगर बाउल देण्यामागे एक खास गोष्ट आहे. जुन्या काळात जेवण झाल्यावर गोड पदार्थ खाल्ल्यानंतर कपड्यांना डाग लागू नये यासाठी फिंगर बाउल देण्यात येत असे. परंतू, सध्या हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये गोड खाण्याच्या आधीच फिंगर बाउल देण्यात येतो.

लिंबू असलेलाच फिंगर बाउल का देण्यात येतो?अनेकांना प्रश्न पडत असेल की, फिंगर बाउलमध्ये लिंबूच का टाकतात?अशी कोणतीही परंपरा नाही. फिंगर बाउलमध्ये लिंबू टाकण्यात येतो याचं कारण म्हणजे लिंबामध्ये अॅन्टी-बॅक्टेरिअल गुण असतात. त्यामुळे कोमट पाण्यात लिंबू टाकल्याने हाताला लागलेला खाण्याचा गंध आणि तेल नाहीसं होतं आणि त्याव्यतिरिक्त असलेले हातावरील बॅक्टेरियाही नाहीसे होतात. 

शिष्टाचारांनुसार...पर्सनॅलिटी ग्रूमिंग तज्ञांचे असे मत आहे की, जेवणाच्या शिष्टाचारांनुसार, फिंगर बाउलमध्ये आपला पूर्ण हात बुडवण्यापेक्षा फक्त बोटं बुडवावीत. अनेकदा लोकं फिंगर बाउलमध्ये हात टाकून लिंबू पिळून काढतात. जे डायनिंग एथिकेट्सनुसार योग्य नाही.  

फिंगर बाउलची पद्धत कशी रूढ झाली?फिंगर बाउलची पद्धत ही अत्यंत जुनी आहे. जुन्या काळात रेस्टॉरंटचे मालक फिंगर बाउल आणि लाइव म्‍यूजिकच्या उपयोगाने उच्चभ्रू लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असत. तसेच आपल्या देशात अनेक ठिकाणी जेवणानंतर फिंगर बाउल देणं परंपरा मानली जाते. तेच अमेरिकेमध्ये ही पद्धत पहिल्या महायुद्धाच्यावेळीच संपली होती. अमेरिका खाद्य प्रशासनाने अतिरिक्त चांदी, बोन चाइना आणि काचेच्या गोष्टींपासून दूर राहण्याचे आदेश दिले होते. 

आपल्याकडे असलेली पद्धतभारतीय संस्कृतीनुसार, भांड्यामध्ये हात धुणं चुकीचं समजले जातं. कारण आपल्याकडे भांडी लक्ष्मीचं प्रतिक मानली जातात. त्यामुळे खरकट्या हातांना जेवणाच्याच ताटात किंवा भांड्यात धुणं योग्य नाही. असे असूनही आपल्याकडील अनेक रेस्टॉरंट्समध्ये फिंगर बाउल देण्यात येतो. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेHealthआरोग्यhotelहॉटेल