शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

चुकीला माफी नाही! 'या' व्यक्तींना एक चूक पडली महागात, आज होत आहेत कोट्यवधींचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 14:21 IST

माणूस हा चुकींचा पुतळा आहे असं म्हटलं जातं. पण माणसांनी अशा काही चुका केल्या की, आता त्या त्यांच्यासाठी आणि समाजासाठी अभिषाप ठरत आहेत.

(Image Credit : Grant Cardone TV)

माणूस हा चुकींचा पुतळा आहे असं म्हटलं जातं. पण माणसांनी अशा काही चुका केल्या की, आता त्या त्यांच्यासाठी आणि समाजासाठी अभिषाप ठरत आहेत. त्यांच्या या चुकांची किंमत आज हजारो-कोटींच्या घरात गेली आहे. अशाच काही चुकांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्या फारच छोट्या चुका होत्या पण आर्थिक नुकसान फार मोठं करून गेल्या.

(Image Credit : Government Technology)

१)  रशियाचा राजा अलेक्झांडर द्वितीयने १८६८ अलास्काला बर्फाने भरलेली जागा समजून अमेरिकेला केवळ ५० कोटी रूपयांना विकलं होतं. अलास्का खरेदी केल्यानंतर अमेरिकेने तिथे खोदकाम केलं, संशोधन केलं. त्यानंतर त्यांना तिथे कोट्यवधींचं सोनं-चांदी आणि खनिज संपत्ती सापडली. त्यामुळे या जागेची किंमत कितीतरी पटीने वाढली.

(Image Credit : GTspirit

२) लंडन स्थित वॉकी टॉकी बिल्डींगच्या निर्माणावेळी सिव्हिल इंजिनिअरने एक मोठी चूक केली. त्याच्या या चुकीमुळे इथे सूर्याची इतकी प्रखर किरणे पडू लागली की, तिथे उभी असलेली कारही वितळू लागते. एकदा ही बाब माहीत नसल्याने एका व्यक्तीने तिथे त्याची जग्वार कार पार्क केली. काही वेळाने त्याच्या कारचे पार्ट्स वितळू लागले होते. या बिल्डींगजवळ प्रखर सूर्यकिरणांमुळे इतरही घटना घडू लागतात. जसे की, फार जास्त गरमी, डोळ्यांना धुसर दिसणे इत्यादी. ही बिल्डींग तयार करताना कर्व्ह झाली, ज्यामुळे या बिल्डींगचं नाव वॉकी-टॉकी पडलं. सिव्हिल इंजिनिअरही चूक आजही अभिषाप ठरत आहे.

३) जर तुम्ही इंटरनेट फार पूर्वीपासून वापरत असाल तर तुम्ही एक्साइट.कॉम ने परिचीत असालच. कारण ज्यावेळी याहू जगातलं सर्वात मोठं सर्च इंजिन होतं तेव्हा दुसरं सर्वात मोठं सर्च इंजिन एक्साइट.कॉम हे होतं. त्यावेळी एक्साइट.कॉमचे सीईओ जॉर्ड बेलला गुगल विकत घेण्यासाठी एक ऑफर मिळाली होती. त्यावेळी गुगलची किंमत केवळ ४८ कोटी रूपये होती. पण कंपनीच्या सीईओ गुगल खरेदी करण्यास नकार दिला. आज गुगलमधून किती कमाई होते हे सर्वांनाच माहीत आहे. आज जर ते गुगल पाहत असतील तर त्यांना नक्कीच त्यांच्या नकाराचा पश्चाताप होत असावा. 

४) अ‍ॅपलचे फाउंडर स्टीव जॉब्स आणि स्टीव ओज्बिन यांच्यानंतर तिसरे फाउंडर रोन वायनने १९७६ मध्ये त्याच्याकडे असलेले कंपनीचे १० टक्के शेअर केवळ ८०० डॉलरला विकले होते. आता जर भारतीय मुद्रेत ही रक्कम मोजायची झाली तर ती ५ हजार रूपये इतकी होते. जर हे शेअर रोन वायनकडे आज असते तर ते सुद्धा त्यांच्या पार्टनरसारखे कोट्यधीश झाले असते. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके