शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

130 कोटी रूपयांचा गुलाब, खरेदी करण्यासाठी असावं लागतं कोट्याधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 13:36 IST

Juliet Rose : हे गुलाबाचं एक फूल खरेदी करण्यासाठी तुम्ही कोट्याधीश असणं गरजेचं आहे. जर तुम्ही कोट्याधीश नसाल तर तुम्ही हे फूल खरेदी करण्याचं स्वप्नही बघू शकत नाही.

Juliet Rose : पावसाळ्यात सगळीकडे हिरवागार नजारा बघायला मिळतो. झाडांना नव्या पालव्या आणि फुलं येतात. वेगवेगळ्या रानटी प्रजातीची फुलं उमलतात. सामान्यपणे तुम्ही अनेक प्रकारची फुलं पाहिली असतील. लाल, पांढरे, गुलाबी, काळे आणि इतरही काही. पण आज आम्ही तुम्हाला अशा गुबालाबाबत सांगणार आहोत, ज्याबाबत कदाचित तुम्ही ऐकलंही नसेल. हे गुलाबाचं एक फूल खरेदी करण्यासाठी तुम्ही कोट्याधीश असणं गरजेचं आहे. जर तुम्ही कोट्याधीश नसाल तर तुम्ही हे फूल खरेदी करण्याचं स्वप्नही बघू शकत नाही.

आम्ही तुम्हाला सांगतोय जूलिएट रोजबाबत. या गुलाबाची किंमत हिऱ्यांपेक्षाही जास्त आहे. चला जाणून घेऊ हा गुलाब इतका का खास आहे? आश्चर्याची बाब म्हणजे हा गुलाब उगवण्यासाठी 15 वर्षांचा कालावधी लागतो. हा जगातला सगळ्यात महाग गुलाब आहे. 

हा गुलाब दिसायला खूप सुंदर आणि याच्या सुगंधाबाबत विचाराल तर सगळं काही विसराल. या सुगंध असा असतो की, तुमचा बिघडलेला मूड काही सेकंदात चांगला होईल. जूलिएट रोज आपल्या खासियतमुळे जगभरात फेमस आहे.

फायनान्स ऑनलाइनच्या एका रिपोर्टनुसार, जूलिएट रोजची किंमत 130 कोटी रूपये आहे. याची किंमत इतकी असण्याचं कारण म्हणजे हे इतर गुलाबांसारखे सहजपणे उगवत नाहीत. ही फुलं उगवण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागते. सगळ्यात आधी 2006 मध्ये जूलिएट रोज उगवण्यात आले होते. हे उगवण्यात डेविड ऑस्टिन नावाच्या व्यक्तीचा हात होता. अनेक प्रयोगांनंतर त्याने हे बहुमूल्य गुलाबाचं फूल उगवलं होतं.

15 वर्षात एकदाच फुलतो हा गुलाब

जूलिएट गुलाब उगवण्यासाठी 15 वर्षांचा कालावधी लागतो. इतके वर्ष याच्या झाडांची काळजी घेतली जाते. तेव्हा कुठे फुलं फुलतात. टाइम्सनाउच्या एका वृत्तानुसार, अनेक प्रकारच्या गुलाबांच्या प्रजाती मिक्स करून जूलिएट गुलाब बनवण्यात आला आहे. यामुळे तो महागडा आहे आणि या कारणाने याचं नाव जूलिएट ठेवलं आहे. 2006 मध्ये पहिल्यांदा उगवला गेल्यावर याची किंमत 90 कोटी रूपये होती. पण आता याची किंमत 130 कोटी रूपये झाली आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स