शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वात महाग बर्गर; किंमत आहे केवळ 63 हजार रुपये 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 19:25 IST

दुकानाचा दर्जा आणि ब्रँड विचारात घेतला तरी बर्गरची किंमत जास्तीत जास्त एक हजार रुपयाच्या वर असणार नाही. पण तुम्ही कधी 63 हजार रुपयांच्या बर्गरविषयी ऐकले आहे का?

टोकियो - हल्लीच्या फास्टफूडच्या जमान्यात पिझ्झा, बर्गर हे अनेकांचा आवडते खाद्यपदार्थ बनले आहेत. तुम्ही विविध ठिकाणी बर्गरची चव चाखली असेलच. पण एका दर्जेदार बर्गरसाठी तुम्ही किती रुपये मोजू शकता? 300, 400 की 600 रुपये? दुकानाचा दर्जा आणि ब्रँड विचारात घेतला तरी बर्गरची किंमत जास्तीत जास्त एक हजार रुपयाच्या वर असणार नाही. पण तुम्ही कधी 63 हजार रुपयांच्या बर्गरविषयी ऐकले आहे का?  नाही ना! ही आहे जगातील सर्वात महाग बर्गरची किंमत. ऐकून धक्का बसला ना. पण हे खरे आहे. एवढा महाग बर्गर जपानमध्ये बनवण्यात आला आहे.  पॅट्रिक सिमाडा याने हा सर्वात महाग बर्गर बनवला आहे. या बर्गरचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला सोन्याच्या कणांचा मुलामा देण्यात आलेला आहे.  सध्या हा बर्गर टोकियोमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच महागडे खाणे खाण्याची हौस असणाऱ्यांसाठी हा बर्गर जून महिन्यापर्यंत उपलब्ध असणार आहे. हा बर्गर बनवण्यासाठी ओक किलो वायगो बीफ पॅटी, फॉई ग्रास, सलाड, चेद्दार चीझ, टोमॅटो आणि कांदे अशा पदार्थांचा वापर करण्यात आला आहे. तसेच या बर्गरचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यासाठी वापरण्यात आलेल्या पावाला सोनेरी चुऱ्याचा वर्ख देण्यात आला आहे. जपानचे नवे सम्राट राजकुमार नरुहितो यांच्या राज्याभिषेकाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी हा महागडा बर्गर बनवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जपानमध्ये काम करत असताना शाही युगाच्या परिवर्तनाचा साक्षीदार होण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य समजतो, असे हा बर्गर तयार करणारे शेफ पॅट्रिक यांनी सांगितले.  

टॅग्स :foodअन्नJara hatkeजरा हटकेJapanजपान