शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
8
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
9
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
10
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
11
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
12
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
13
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
14
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
15
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
16
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
17
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
18
सत्ता येते-जाते, साहित्यिक संस्थांवर ‘कब्जा’ हवा! मोक्याच्या जागेसाठी लागल्या राजकीय नजरा
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

दुसऱ्या महायुद्धात पायलटसह बेपत्ता झाले लढाऊ विमान; आता 80 वर्षांनंतर सापडले अवशेष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 20:37 IST

समुद्राच्या तळाशी या विमानाचे अवशेष सापडले आहेत. पायलटचे काय झाले? पाहा...

World War 2 Plane: जगभरातील अनेक देशांमध्ये अनेकदा युद्ध झाले आहे. पण, दुसऱ्या महायुद्धाला सर्वात भीषण युद्ध मानले जाते. त्यात लाखो निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. विविध देशांचे हजारो सैनिकही त्यात मरण पावले. काही सैनिकांचा तर मृतदेहदेखील आजपर्यंत सापडले नाहीत. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अनेक विमानेही अचानक बेपत्ता झाली होती, ज्यांचा अनेक वर्षांनंतर सुगावा लागला आहे. असेच एक विमान समुद्राच्या तळाशी सापडले आहे. 

अमेरिकन एअरमन वॉरेन सिंगर, 25 ऑगस्ट 1943 रोजी फॉगियाजवळील इटालियन एअरफील्डवर झालेल्या हल्ल्यादरम्यान बेपत्ता झाले होते. यावेळी ते P-38 लायटनिंग फायटर प्लेनमध्ये होते. 'द सन'च्या वृत्तानुसार, वॉरन कधीही त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचले नाही. यूएस एअरफोर्सच्या रेकॉर्डनुसार, त्यांचे शेवटचे ठिकाण फोगियापासून 22 मैल दूर होते. विमानासह अचानक बेपत्ता झाल्यामुळे सर्वांनी त्यांना मृत मानले.

आता सापडले विमानाचे अवशेष सखोल चौकशीनंतर 26 ऑगस्ट 1944 रोजी वॉरेन सिंगरला मृत घोषित करण्यात आले. त्यांच्यासोबत काय झाले, हे रहस्य अनेक वर्षांनंतर उलगडले आहे. आता 80 वर्षांनंतर वॉरेन सिंगर ज्या विमानात होते, त्या विमानाचे अवशेष सापडले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, पाणबुड्यांना मॅन्फ्रेडोनियाच्या खाडीत 40 फूट खोल पाण्यात या विमानाचे अवशेष सापडले आहेत. 

विमानाच्या अवशेषाची ओळख पटवणारे डायव्हर डॉ. फॅबियो बिस्किओटी म्हणाले की, विमान चांगल्या स्थितीत आहे आणि तांत्रिक समस्येमुळे हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. अपघातापूर्वी वॉरेन सिंगरने विमानातून उडी मारली, पण पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असावा. या विमानाच्या अवशेषात 50 कॅलिबर बुलेट आणि एक इंजिन क्रॅंककेसदेखील सापडला आहे. अपघात झाला तेव्हा वॉरन फक्त 22 वर्षांचा होते आणि 5 महिन्यांपूर्वीच मार्गारेट नावाच्या मुलीशी त्याचे लग्न झाले होते. या घटनेच्या एका वर्षानंतर मार्गारेटने एका मुलाला जन्म दिला. आता या विमानाचा शोध लागल्यावर सिंगरचा नातू म्हणतो की, वॉरन आपल्या सर्वांसाठी हिरो आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सAmericaअमेरिका