शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

'या' घड्याळात कधीच वाजत नाही 12, कारण वाचून तुम्हीही व्हाल हैराण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 12:22 IST

A Clock on Town Square : स्वित्झर्लॅंडमधील सोलोथर्न हे शहर त्याच्या वेगळेपणासाठी नेहमीच चर्चेत असतं. या शहराची खासियत म्हणजे या शहराचं ११ नंबरशी वेगळंच नातं आहे. इथे प्रत्येक वस्तूच्या डिझाइनचा आणि या क्रमांकाचा काहीना काही संबंध आवर्जून असतो.

A Clock on Town Square  : जगात इतक्या अजब गोष्टी आहेत ज्यांचा आपण कधी विचारही करू शकत नाही. अशा गोष्टी नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. अशाच एका गोष्टीबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हाला हे चांगलंच माहीत आहे की, घड्याळात 11 वाजल्यानंतर 12 वाजतात. पण जगात अशीही एक घड्याळ आहे ज्यात 12 वाजतच नाही. 

स्वित्झर्लॅंडमधील सोलोथर्न हे शहर त्याच्या वेगळेपणासाठी नेहमीच चर्चेत असतं. या शहराची खासियत म्हणजे या शहराचं ११ नंबरशी वेगळंच नातं आहे. इथे प्रत्येक वस्तूच्या डिझाइनचा आणि या क्रमांकाचा काहीना काही संबंध आवर्जून असतो.

इथे असलेल्या चर्चेसची आणि चपलांची संख्याही 11-11 आहे 11 ऐतिहासिक झरे, 11 संग्रहालय आणि 11 टॉवर आहेत. येथील सेंट उर्सूसच्या मुख्य चर्चमध्ये तुम्हाला 11 क्रमांकासोबत लोकांचा विशेष स्नेह बघायला मिळेल. हा चर्च 11 वर्षात बांधून तयार करण्यात आला होता. इथे पायऱ्यांचे तीन सेट आहेत. प्रत्येक सेटमध्ये 11 पायऱ्या, 11 दरवाजे, 11 घंट्या आहेत. 

11 या क्रमांकाचा येथील लोकांच्या जीवनात खास महत्त्व आहे. प्रत्येक 11व्या वाढदिवसाला इथे खास समारोहाचं आयोजन केलं जातं. प्रॉडक्टच्या नावांमध्ये 11 क्रमांक जुळला आहे. जसे की, ऑफी बिअर म्हणजेच बिअर 11, 11 आई चॉकोलेड(11 चॉकलेट).

घड्याळात वाजत नाही 12

अशाप्रकारच्या घड्याळाबाबत वाचून तर तुम्हीही आश्चर्यचकित झाले असाल. या शहरातील मुख्य चौकात एक घड्याळ आहे. या घड्याळात तासांच्या केवळ 11 रेषा आहेत. 12 यातून गायब आहे.

काय आहे कारण?

सोलोथर्नमधील लोकांना क्रमांक 11 सोबत इतका का जिव्हाळा आहे याच्या वेगवेगळ्या थेअरी आहेत. एका थेअरीनुसार, सोलोर्थन चे लोक फार मेहनत करतात, पण त्यांच्या जगण्यात आनंद नव्हता. काही काळाने शेजारच्या डोंगरातून पऱ्या येऊ लागल्या. त्या पऱ्या लोकांना प्रोत्साहन देत होत्या आणि त्यांचं कौतुक करत होत्या. याने लोकांमध्ये आनंद भरला गेला. 

पऱ्यांना तसं इंग्रजीमध्ये एल्फ म्हटलं जातं आणि जर्मन भाषेत एल्फचा अर्थ 11 होतो. लोकांनी अशाप्रकारे त्या पऱ्यांना 11 क्रमाकांशी जोडलं होतं आणि त्यांच्या उपकारांची आठवण म्हणून 11 क्रमांकाला महत्त्व देऊ लागले. दुसरी एक थेअरी सांगते की, याचा संबंध बायबलसोबत आहे. बायबलमध्ये 11 क्रमांकाला खास क्रमांक सांगण्यात आलं आहे. त्यामुळेच येथील लोकांमध्ये या क्रमांकाबाबत खास प्रेम आहे. 

काय आहे इतिहास?

सोलोथर्नच्या इतिहासात 11 क्रमांकाचा उल्लेख पहिल्यांदा 1252 मध्ये आढळतो. असे सांगितले जाते की, याचवर्षी शहराच्या काउन्सिलसाठी 11 सदस्यांची निवड करण्यात आली होती. नंतर 1481 मध्ये सोलोथर्न स्विस संघाचा 11 वा क्रंटोन झाला. नंतर अनेक वर्षांनी याला 11 प्रॉटेक्टोरेट्समध्ये विभागण्यात आलं. या ठिकाणाच्या इतिहासात मध्यकाळात 11 समुदायांचा उल्लेखही आढळतो.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके