शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

असं एक पुस्तक जे आजही कुणी वाचू शकले नाहीत, आजही बनून आहे रहस्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 14:52 IST

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे पुस्तक 240 पानांचं आहे. पण हे आजपर्यंत कुणीही वाचू शकलं नाही, असं बोललं जातं.

जगात फार आधीपासून पुस्तक लिहिण्याची परंपरा आहे. कोट्यावधी पुस्तकं जगात असतील. पण काही अशीही ऐतिहासिक पुस्तकं आहेत ज्यांबाबत हैराण करणाऱ्या गोष्टी समोर येतात. आजही अशी काही पुस्तकं आहेत ज्यातील रहस्य मनुष्यांना उलगडता आलेलं नाही. एका अशात रहस्यमय पुस्तकाबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे पुस्तक 240 पानांचं आहे. पण हे आजपर्यंत कुणीही वाचू शकलं नाही, असं बोललं जातं.

इतिहासकारांनुसार, हे रहस्यमय पुस्तक 600 वर्ष जुनं आहे. कार्बन डेटिंगच्या माध्यमातून कळाले की, हे पुस्तक १५व्या शतकात लिहिलं गेलं आहे. तसेच हे पुस्तक हाताने लिहिलं गेलं आहे. पण यात नेमकं काय लिहिलंय आणि कोणत्या भाषेत लिहिलंय हे मात्र आजपर्यंत कुणाला समजू शकलेलं नाही.

हे पुस्तक आजही एखाद्या न सोडवता येणाऱ्या कोड्यासारखं आहे. या पुस्तकाला 'वॉयनिक मॅन्युस्क्रिप्ट' असं नाव देण्यात आलंय. तसेच या पुस्तकात मनुष्यांसोबतच अनेक झाडांचेही चित्र काढण्यात आले आहेत. पण आश्चर्याची बाब म्हणजे या पुस्तकात अशाही काही झाडांचे चित्र आहेत, जे पृथ्वीवर असलेल्या कोणत्या झाडांशी मिळते-जुळते नाहीत.

या पुस्तकाचं नाव 'वॉयनिक मॅन्युस्क्रिप्ट' हे इटलीच्या एका बुक डिलर विलफ्रीड वॉयनिक यांच्या नावावरून ठेवण्यात आलंय. असे मानले जाते की, त्यांनी हे रहस्यमय पुस्तक 1912 मध्ये कुठूनतरी खरेदी केलं होतं.

असे सांगितले जाते की, या पुस्तकाला अनेक पाने होती. पण काळानुसार याची अनेक पाने खराब झालीत. सध्या या पुस्तकाची केवळ 240 पाने शिल्लक आहेत. या पुस्तकात काय लिहिलंय याबाबत काही खास माहिती समोर आली नाही. पण यातील काही शब्द लॅटीन आणि जर्मन भाषेत असल्याचं समजलं.

अनेक लोकांचं असं मत आहे की, एखादं किंवा अनेक रहस्य लपवण्यासाठी हे पुस्तक असं लिहिण्यात आलं असावं. आता ते रहस्य काय आहे हे तर पुस्तक लिहिणाऱ्या लेखकालाच माहीत असेल. कदाचित येणाऱ्या काळात हे पुस्तक कुणी वाचूही शकेल.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके