लॉन्च झाला जगातील सगळ्यात महागडा लिफाफा, किंमत वाचून उडेल झोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 10:19 AM2024-01-09T10:19:28+5:302024-01-09T10:21:56+5:30

World Most Expensive Envelope: फ़्रेंच लक्झरी ब्रँड हर्मेस (Hermes) ने नुकतंच आपल्या ‘स्टेशनरी प्रोडक्ट’ची रेंज लॉंच केली आहे.

World most expensive envelope Hermes | लॉन्च झाला जगातील सगळ्यात महागडा लिफाफा, किंमत वाचून उडेल झोप

लॉन्च झाला जगातील सगळ्यात महागडा लिफाफा, किंमत वाचून उडेल झोप

World Most Expensive Envelope: सोशल मीडियावर सतत काहीना काही व्हायरल होत असतं. सध्या एका लक्झरी ब्रँडच्या लिफाफ्याने म्हणजे इन्व्हलपने लोकांची झोप उडवली आहे. याची किंमत ऐकून लोकांची झोप उडाली आहे. लोक त्यावरून गंमतही करत आहेत. चला जाणून घेऊ हे इन्व्हलप इतकं महाग का आहे आणि किती आहे त्याची किंमत...

फ़्रेंच लक्झरी ब्रँड हर्मेस (Hermes) ने नुकतंच आपल्या ‘स्टेशनरी प्रोडक्ट’ची रेंज लॉंच केली आहे. त्यात हे इन्व्हलपही आहे. या इन्व्हलपची किंमत 125 डॉलर म्हणजे 10, 400 रूपयांच्या आसपास आहे. अशात हे इन्व्हलप जगातील सगळ्यात महाग इन्व्हलप झालं आहे.

हर्मेस इंटरनॅशनल (Hermes International) फ्रान्समधील एक लक्झरी ब्रँड आहे. ही कंपनी लेदर बॅग्स, ज्वेलरी, परफ्यूम, घड्याळी, लाइफस्टाईल प्रोडक्ट्स बनवते. हर्मेस 1837 सालापासून लक्झरी प्रोडक्ट्स बनवत आहे. ही कंपनी खासकरून आपल्या लेदर प्रोडक्टसाठी प्रसिद्ध आहे.

हर्मेस (Hermes) ने काही दिवसांआधी ‘हाय-एंड स्टेशनरी’ कलेक्शन लॉन्च केलं. यादरम्यान त्यांचं ‘A4’ आणि ‘A5’ साइजचं इन्व्हलप चर्चेत आहे. हे कंपनीच्या साईटवर 10,400 रूपयांना उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की, हे इन्व्हलप खास पद्धतीने तयार करण्यात आलं आहे. हे काही साध्या कागदाचं इन्व्हलप नाही. हे रेशम लपेटून तयार करण्यात आलं आहे. 

या ब्रँडने याआधीही लक्झरी पेन आणि नोटबुक लॉन्च केले आहेत. हर्मेस पेपरवेटही विकते. ज्यांची किंमत 2,950 डॉलर म्हणजे 2.5 लाख रूपयांच्या आसपास आहे. आपल्या किंमतीमुळे कंपनीला अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. 

Web Title: World most expensive envelope Hermes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.