जणू जग थांबले ! फेसबुक तासभर ठप्प !!

By Admin | Updated: January 28, 2015 05:39 IST2015-01-28T05:23:11+5:302015-01-28T05:39:30+5:30

प्रचंड व्यस्त असतानाही वेळेत वेळ काढून फेसबुक पेजवर धडकणाऱ्या अब्जावधी युजर्सना मंगळवारी दुपारी ‘जणू जग थांबले’

The world has stopped! Facebook jam for an hour !! | जणू जग थांबले ! फेसबुक तासभर ठप्प !!

जणू जग थांबले ! फेसबुक तासभर ठप्प !!

नवी दिल्ली : प्रचंड व्यस्त असतानाही वेळेत वेळ काढून फेसबुक पेजवर धडकणाऱ्या अब्जावधी युजर्सना मंगळवारी दुपारी ‘जणू जग थांबले’ असाच अनुभव आला. तब्बल तासभर फेसबुक ठप्प झाले. काही देश वगळता भारतासह जगभरातील यूजर्सनी फेसबुकच्या इतिहासात दुसऱ्यांदा हा अनुभव घेतला. नऊ जून रोजीही असाच व्यत्यय आला होता.
भारतीय वेळेनुसार दुपारी पावणे बाराच्या सुमारास म्हणजे कार्यालयातले अर्धे काम झाले असताना आणि महाविद्यालयीन तरूणाईचे पहिले काही लेक्चर्स झाले असतानाच अचानक फेसबुक थांबले. लॉग इन करण्याचा प्रयत्न करताच ‘माफ करा, काहीतरी चुकीचे घडले आहे. आम्ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत असून लवकरच ती दूर केली जाईल, असा संदेश पेजवर येत होता. फेसबुकप्रमाणे इन्स्टाग्रामचीही सेवा ठप्प झाली होती. त्याचबरोबर फेसबुक आणि फेसबुक मेसेंजर हे अ‍ॅपही ठप्प झाले होते. संगणकांवर हा अनुभव येत असल्याने अनेकांनी मोबाईलवरुन फेसबुक हाताळण्याचा प्रयत्न केला. तिथेही त्यांना हाच अनुभव आला.
नंतर वेबसाईटची एररची माहिती देणाऱ्या ‘डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट आयएसयूपी डॉट मी’ या साईटवर अनेकांनी उड्या घेतल्या, तेव्हा कुठे हा प्रकार समोर आला. तोपर्यंत आपल्याच इंटरनेटची एरर अशी समजूत अनेकांनी करुन घेतली.

Web Title: The world has stopped! Facebook jam for an hour !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.