Sperm Race : खो-खो, कब्बडी, क्रिकेट, बॅडमिंटन, रनिंग, स्वीमिंग अशा कितीतरी स्पर्धा तुम्ही पाहिल्या असतील. पण तुम्ही कधी विचारही केला नसेल अशी एक रेसिंग लॉस एन्जलिसमध्ये पार पडणार आहे. इथे जगातील पहिली स्पर्म रेस आयोजित करण्यात आली आहे. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन? तर होय, इथे एका स्पर्म रेसचं आयोजन करण्यात आलं आहे. ऐकायला जरा विचित्र वाटू शकतं, पण हे सत्य आहे.
स्पर्म रेसचा उद्देश
स्पर्म रेसचा उद्देश पुरूषांमध्ये प्रजननाबाबत जागरूकता वाढवणं आहे. या स्पर्म रेसच्या माध्यमातून पुरूषांचं आरोग्य, त्यांची फर्टिलिटी आणि जीवनशैलीसंबंधी काही गोष्टी समोर आणल्या जातील. या स्पर्म रेसचं आयोजन स्टार्टअप कंपनी स्पर्म रेसिंगद्वारे करण्यात येत आहे.
या स्पर्म रेसचं आयोजन २५ एप्रिल रोजी हॉलिवूड पॅलेडिअममध्ये होणार आहे. ज्यात साधारण १ हजार लोक सहभागी होतील. आता या अनोख्या रेसमध्ये मैदानात तुम्हाला स्पर्म धावताना तर दिसणार नाही. पण या स्टार्टअप कंपनीनं ही रेस बघण्यासाठी खास व्यवस्था केली आहे. रेस अशाप्रकारे डिझाइन करण्यात आली आहे की, प्रेक्षक टेक्नॉलॉजीच्या मदतीनं स्पर्मची गति, दिशा आणि परफॉर्मन्स बघू शकतील.
स्पर्म रेसिंग बघण्यासाठी हाय रिझॉल्यूशन कॅमेरे आणि मायक्रोस्कोपिक रेस ट्रॅकचा वापर केला जाणार आहे. जो ह्यूमन रिप्रोडक्टिव सिस्टमची नक्कल करतो. ही रेस रिअल टाइममध्ये आयोजित केली जाणार आहे. स्टार्टअप कंपनी या रेसला एका मोठ्या इव्हेंटसारखं कव्हर करेल. ज्यात प्रेस कॉन्फरन्स, लाईव्ह कॉमेंट्री आणि इतकंच नाही तर बेटिंगही लावता येणार. या रेससाठी कंपनीनं १ मिलियन डॉलरचा फंड जमा केला आहे.
चुकीची लाइफस्टाईल आणि स्पर्मची क्लालिटी
अनेक लोकांना असं वाटतं की, ही काय फालतुगिरी आहे. पण ही रेस आयोजित करण्यामागे एक मोठं कारण आहे. या रेसचं आयोजन मुख्यपणे पुरूषांमध्ये कमी होत चाललेल्या प्रजनन क्षमतेबाबत जागरूकता पसरवणं आहे. रिसर्चमधून समोर आलं आहे की, गेल्या ५० वर्षात जगभरात स्पर्म काउंटची संख्या ५० टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. स्पर्म रेसिंगचा मुख्य उद्देश लोकांचं या मुद्द्याकडे लक्ष वेधणं आहे. तणाव, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि स्मोकिंग या सवयींमुळे स्पर्म क्वालिटीवर प्रभाव पडत आहे.