शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

कुत्र्यांना फिरवण्यासाठी सोडली नोकरी, आता महिन्याला कमावते लाखो रूपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 14:45 IST

एका महिलेने कुत्र्यांना फिरणवण्याचा बिझनेस सुरू केला आणि त्यातून महिन्याला लाखो रूपये कमाई करते.

अनेकदा लोकांना तुम्ही त्यांचे पाळीव कुत्रे फिरायला नेताना बघत असाल. अनेकदा घरातील लोक त्यांना फिरायला नेतात तर कधी दुसरे लोक. पण हे दुसरे लोक त्यांना फिरायला नेण्याचे किती पैसे घेत असतील? या कामातून लाखो रूपये कमावले जाऊ शकतात. याचं एक उदाहरण समोर आलं आहे. एका महिलेने कुत्र्यांना फिरणवण्याचा बिझनेस सुरू केला आणि त्यातून महिन्याला लाखो रूपये कमाई करते. केवळ तीन महिन्यात तिच्या कंपनीचा टर्नओवर 50 लाखांपेक्षा जास्त झाला आहे.

द सनच्या रिपोर्टनुसार, नॉर्विचमध्ये राहणारी 28 वर्षीय ग्रेस बटरी बरिस्ता कॉफी कॅफेमध्ये काम करत होती. इथे ती कॉफी बनवत होती. अनेक तास तिला काम करावं लागत होतं. पैसेही कामानुसार मिळत होते. बटरीचं कुत्र्यांवर खूप प्रेम होतं. एक दिवस तिच्या एका मित्राने सांगितलं की, तू तर कुत्र्यांना फिरवण्यात एक्सपर्ट झाली आहे. त्यांनाच फिरवण्याचं काम का करत नाही? इथून बटरीला आयडिया सुटली. तिने लगेच नोकरी सोडली.

ही घटना 2019 मधील आहे. ग्रेस बटरीने एक कंपनी सुरू केली. ती याद्वारे कुत्र्यांना फिरवण्याचं काम करत होती. दररोज सहा तास ती त्यांना फिरवत होती आणि या बदल्यात तिला कुत्र्यांच्या मालकांकडून पैसे मिळत होते. सुरूवातीला तिच्याकडे केवळ 4 कस्टमर होते, पण आता तिच्याकडे शेकडो कस्टमर आहेत. ती स्वत: 36 कुत्र्यांना फिरवते. यातून ती दरवर्षी 42 हजार पाउंड म्हणजे साधारण 44 लाख रूपये कमाई करते. सगळा खर्च जाऊन तिच्याकडे 34 लाख रूपये वाचतात.

बटरी म्हणाली की, कंपनीचा खर्च जास्त होतो कारण त्यांना स्टोर किंवा परिसरासाठी पैसे द्यावे लागतात. वीज, गॅससारख्या अनेक गोष्टी असतात. पण माझ्या कंपनीत असा काही खर्च नाही. माझा सगळ्यात जास्त खर्च पेट्रोलवर होतो. ग्रेस सांगते की, डॉग वॉकरना आपल्या काही समस्या असतात. पण जर तुम्ही या कामावर प्रेम कराल. तर काही अडचण नाही. मला प्राण्यांवर प्रेम आहे. खासकरून कुत्र्यांवर. त्यामुळे मला हे काम आवडतं.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके