शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

108 वर्ष जुनी किडनी लावून आजही महिला आहे फीट, डॉक्टरही झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 11:23 IST

50 वर्षाआधी महिलेच्या आईने तिला किडनी दान केली होती. आजही ती काम करत आहे.

अवयव प्रत्‍यारोपण आजच्या काळात फार काही मोठी बाब नाही. पण डॉक्टरही हे मान्य करतात की, कोणताही प्रत्‍यारोपण केलेला अवयव 20-30 वर्षापेक्षा जास्त काळ चालू शकत नाही. यानंतर काहीना काही समस्या येणं सुरू होतात. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, ब्रिटनमध्ये एका महिलेच्या शरीरात 108 वर्ष जुनी किडनी आहे. 50 वर्षाआधी महिलेच्या आईने तिला किडनी दान केली होती. आजही ती काम करत आहे. तिला कोणतीही समस्या नाही जे बघून डॉक्टरही हैराण झाले.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, इंग्लंडमध्ये राहणारी सू वेस्टहेड जेव्हा 12-13 वर्षांची होती तेव्हा तिला किडनीची समस्या झाली होती. त्याच वयात डायलिसिस सुरू करण्यात आलं आणि शेवटी 25 वयात तिची किडनी खराब झाली. डॉक्‍टरांनी प्रत्‍यारोपणाचा सल्ला दिला. तेव्हा आई मेटकाफने आपली एक किडनी तिला दान केली. जुलै 1973 मध्ये रॉयल व्हिक्टोरिया इन्फर्मरीमध्ये तिची सर्जरी झाली. जर आज तिची आई असती तर ती 108 वयाची असली असती. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, सू वेस्टहेडला तिच्या आईची किडनी प्रत्‍यारोप‍ण करून 50 वर्ष झाली आहेत. आजही त्यांना काहीच समस्या नाही. 

डॉक्टर हे बघून हैराण आहेत कारण त्यांचं मत आहे की, प्रत्यारोपण केवळ जास्तीत जास्त 20 वर्षे चालतं. दुसरीकडे सू वेस्टहेडने याला आईच्या वाढदिवसासारखं सेलिब्रेट करण्याची तयारी सुरू केली आहे. ती प्रत्‍यारोपणाची गोल्‍डन जुबली अॅनिवर्सरी साजरी करणार आहे. सू च्या आईचं 1985 मध्ये एका अपघातात निधन झालं होतं. वेस्टहेड म्हणाल्या की, जेव्हा माझं ट्रांसप्लांट झालं तेव्हा मी विचार केला की, मला पाच वर्ष जरी मिळाले तरी मी खूप भाग्यवान ठरेल. मात्र माझी आई आणि डॉक्टरांमुळे मी आज 50 वर्षांनंतरही जिवंत आहे आणि निरोगी आहे.

डॉक्टर काय म्हणाले?

सू ने बीबीसीला सांगितलं की, माझ्या आईने मला खरंच मला जीवनदान दिलं आहे. कारण मी जास्त काळ जगू शकणार नव्हती जर तिने मला किडनी दिली नसती. मी चालूही शकत नव्हते. माझा रंग पिवळा झाला होता. पण प्रत्‍यारोपणानंतर अचानक माझ्यात बदल झाला. तुम्हीही तुमच्या कुटुंबियांना अवयव दान करू शकता.सू वेस्टहेडचे डॉक्टर नेफ्रोलॉजिस्ट राचेल डेविसन म्हणाले की, आमची टेस्ट केल्या आणि ती पूर्णपणे बरी आहे. ही एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नाही. यावरून हे स्पष्ट होतं की, प्रत्‍यारोपण एखाद्याला किती लांब आयुष्य देऊ शकतं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सHealthआरोग्य