शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: महिलेने एक्स बॉयफ्रेन्डवर असा उगवला सूड, गिफ्ट दिलेल्या बाइकला लावली आग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 15:36 IST

मीडिया रिपोर्टनुसार, कथितपणे कनोकला तिच्या एक्स बॉयफ्रेन्डवर सू़ड उगवायचा होता. कारण तो तिला सोडून गेला होता आणि परत येण्यास त्याने नकार दिला होता.

एका महिलेने तिच्या एक्स बॉयफ्रेन्डवर सूड उगवण्यासाठी असं काही केलं जे पाहून सगळेच हैराण झाले. महिलेने सूड उगवण्यासाठी एक्स बॉयफ्रेन्डच्या बाइकला आग लावली. महिलेचं हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना थायलॅंडमधील असून ३६ वर्षीय कनोक वानने बॅंकॉकच्या एका स्कूल पार्किंगमध्ये उभी असलेली एक्सची बाइक पेट्रोल टाकून पेटवली.

मीडिया रिपोर्टनुसार, कथितपणे कनोकला तिच्या एक्स बॉयफ्रेन्डवर सू़ड उगवायचा होता. कारण तो तिला सोडून गेला होता आणि परत येण्यास त्याने नकार दिला होता. सुदैवाने या घटनेत कुणाला काही झालं नाही. मात्र, आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाची गाडी तिथे पोहोचेपर्यत इतरही काही गाड्या आगीच्या कचाट्यात सापडल्या. (हे पण वाचा : गर्लफ्रेन्डच्या रूममध्ये बॉयफ्रेन्डला दिसलं असं काही, त्यानेच झाला तिचा भांडाफोड!)

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, 'आम्हाला शाळेच्या खाली असलेल्या पार्किंगमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली होती. ही आग तिसऱ्या मजल्यावर लागली होती. सुदैवाने यात कुणीही जखमी झालं नाही. कारण कोरोना महामारीमुळे मुलांचे क्लासेस ऑनलाइनच सुरू आहेत. (हे पण वाचा : हेच होणार ना! आपल्याच लग्नात नवरदेवाने केलं असं काही, नवरीने थेट लग्न करण्यास दिला नकार)

अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी १० मिनिटात आग आटोक्यात आणली आणि आग पसरणं रोखलं. जेव्हा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले तेव्हा त्यांना एक महिला दिसली. ही महिला शाळेतील एका कर्मचाऱ्याची एक्स असल्याचं समजलं. या महिलेला बुधवारी अटक करण्यात आली. 

पोलिसांनुसार, महिलेने तिच्या एक्स बॉयफ्रेन्डला साधारण २३ लाख रूपये किंमतीची बाइक गिफ्ट केली होती. त्यावेळी दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. पोलिसांनुसार, महिलेला त्याची बाइक जाळून त्याच्यावर सूड उगवायचा होता. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. 

टॅग्स :ThailandथायलंडJara hatkeजरा हटके