शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एका दुर्मिळ आजारामुळे पोटात बनत होता गॅस, 8 वर्षापासून जेवत नाहीये तरूणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 16:31 IST

लिव म्हणाली की, 3 वर्षाची असतानापासून तिला जेवण करताना पोटात वेदना होत होत्या.

पोटात गॅस होणं किंवा अ‍ॅसिडिटी होणं या समस्या सामान्य समजल्या जातात. पण या समस्यांकडे दुर्लक्ष करणं किंवा गंभीरतेने न घेणं महागतही पडू शकतं. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका 25 वर्षीय लिव रोज नावाच्या तरूणीसोबतही असंच झालं. जेव्हा लिव 18 वर्षाची होती तेव्हा तिला पोटात गॅस होण्याची समस्या होत होती. असह्य वेदना होत होत्या. डॉक्टरांना दाखवलं तर त्यांनी सामान्य अ‍ॅसिडिटी असल्याचं सांगितलं. पण तिचं दुखणं काही कमी झालं नव्हतं. नंतर जेव्हा गंभीरतेने टेस्ट केल्या गेल्या तेव्हा समजलं की, तिला गॅस्ट्रोपेरेसिस आजार झाला आहे. ज्यामुळे ती आता गेल्या 8 वर्षापासून काहीच खाऊ शकत नाहीये. तिला हृदयावाटे जेवण दिलं जातं.

मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, लिव म्हणाली की, 3 वर्षाची असतानापासून तिला जेवण करताना पोटात वेदना होत होत्या. ती अनेकदा डॉक्टरांकडे गेली. पण कुणीही तिला गंभीर आजार असल्याचं सांगितलं नव्हतं. हळूहळू वेदना खूप वाढल्या. 17 वर्षाची झाली तेव्हा समस्या खूपच वाढली. काहीही तेल मसाल्याचं खाल्लं तर तिला उलटी होत होती. अन्न पचत नव्हतं. भूक लागत होती, पण काही खाल्लं तर वेदना होत होत्या. नंतर तिला डॉक्टरांनी ईटिंग  डिसऑर्डर असल्याचं सांगितलं. अनेक टेस्ट केल्यावर समजलं की, तिला एक दुर्मिळ आजार आहे. याला पोटाचा लकवाही म्हणतात. यात आतड्या व्यवस्थित काम करत नाहीत.

कसं देतात जेवण

आता डॉक्टर तिला हिकमॅन लाइनमधून आहार देतात. ही लाइन सरळ हृदयापर्यंत जाते, तिथून रक्ताच्या माध्यमातून शरीराला पोषण दिलं जातं. दूध पिण्यासाठी नाकात नळी टाकली आहे. इन्फेक्शन होऊ नये म्हणून ही हिकमॅन लाइन रोज साफ करावी लागते.

लिवच्या दर दोन आठवड्यांनी ब्लड टेस्ट केल्या जातात. तिची एक नस बदली गेली आहे. ज्यावर सर्जरी करण्यात आली आणि नस कापून काढण्यात आली. त्याजागी कृत्रिम नस बसवली आहे. लिव म्हणाली की, मला आता आधीपेक्षा बरं वाटतं. पण माझ्या घरातील सगळे जेवण असतात, तेव्हा मलाही भूक लागते. त्यामुळे त्यावेळी मी माझ्या रूममध्येच राहते. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेHealthआरोग्य