शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी सो़डून 'कतरिना' झाली सफाई कर्मचारी; फ्रीमध्ये दुसऱ्यांचं घर करते स्वच्छ, 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 12:53 IST

कतरिना मनापासून हे काम करत आहे. आता लोकही तिच्या कामाचं भरभरून कौतुक करू लागले आहेत. ती साफसफाई करण्यासाठी एकही पैसा कोणाकडून घेत नाही.

प्रत्येकाला चांगली नोकरी हवी असते पण फिनलँडच्या कतरिनाची गोष्टच वेगळी आहे. आधी चांगली नोकरी मिळवली आणि काही दिवसांनी नोकरी सोडून सफाई कर्मचारी झाली. आता ती अस्वच्छ झालेली घरं फुकटात साफ करत जगभर फिरत आहे. लोकांमध्ये 'क्लिनिंगची राणी' म्हणूनही ती प्रसिद्ध आहे. ती 2 दिवसात कोणतेही घर पूर्णपणे साफ करते. कतरिना ऑरी (वय २९ वर्षे) ही मूळची फिनलँडची. कतरिनाचे म्हणणे आहे की, ती नोकरी करताना खूश नव्हती. तिला साफसफाईची आवड आहे, म्हणून तिने आपली नोकरी सोडून स्वच्छतेसाठी जगभर फिरण्याचा निर्णय घेतला. 

कतरिना मनापासून हे काम करत आहे. आता लोकही तिच्या कामाचं भरभरून कौतुक करू लागले आहेत. ती साफसफाई करण्यासाठी एकही पैसा कोणाकडून घेत नाही. साफसफाई करून ती लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाली आहे. यासोबतच तिची सोशल मीडियावर देखील जादू पाहायला मिळत आहे. तिथेही तिचा मोठा चाहता वर्ग आहे. टिकटॉकवर तिचे  78 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. 

लोकप्रियतेमुळे तिला आता स्पॉन्सरशिप मिळाली आहे. टिकटॉकवर पोस्ट केलेल्या साफसफाईच्या व्हिडिओमधून कतरिना जे काही कमावते, त्यातून ती तिचा प्रवास खर्च करते. 2 दिवसात संपूर्ण घर साफ करते, कतरिना म्हणते 'मला घाणीची भीती वाटत नाही, पण घाण मला घाबरते.' ती दोन दिवसात कोणतेही अस्वच्छ घर पूर्णपणे साफ करते. तीन मुलांच्या आईच्या घराची प्रथम साफसफाई करून तिने हे काम सुरू केलं. सुरुवातीला प्रवास खर्चाचे व्यवस्थापन करणे थोडे आव्हान होते, परंतु आता कोणतीही अडचण नाही.

कतरिनाने 2021 मध्ये नोकरी सोडली. नोकरी सोडल्यानंतर तिने आपले संपूर्ण आयुष्य स्वच्छतेकडे वाहून घेतले आहे. ती हे तिचं करिअर असल्याचं म्हणते. या कामामुळे आता तिच्याकडे अनेक सफाई उत्पादनांच्या जाहिरातीही आहेत. अशाप्रकारे कतरिना स्पॉन्सरशिपमधून भरपूर पैसे कमवते. याशिवाय ती सोशल मीडियावर साफसफाईचे व्हिडीओ टाकून देखील पैसे कमवते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jara hatkeजरा हटके