शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

घराची सफाई करताना महिलेला सॉक्समध्ये सापडली अशी वस्तू, रातोरात बनली लखपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 14:05 IST

जी वस्तू या महिलेला मिळाली त्यामुळे ती मालामाल झाली. या सॉक्समध्ये एक हिऱ्याची अंगठी होती. जोआना नावाच्या महिलेला ही अंगठी सापडली.

असं म्हणतात की, एखाद्याचं नशीब कधी कसं चमकेल हे सांगता येत नाही. एखादा कोट्याधीश रस्त्यावर येऊ शकतो तर एखादा भिकारी कोट्याधीश बनू शकतो. एका महिलेसोबत असंच काहीसं झालं. तिला एका जुन्या सॉक्समध्ये असं काही सापडलं ज्याचा तिने कधी आयुष्यातही विचार केला नसेल. जी वस्तू या महिलेला मिळाली त्यामुळे ती मालामाल झाली. या सॉक्समध्ये एक हिऱ्याची अंगठी होती. जोआना नावाच्या महिलेला ही अंगठी सापडली.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, जेव्हा जोआना बीबीसीच्या अॅंटीक्स रोडशोमध्ये ही अंगठी घेऊन आली तेव्हा अ‍ॅंटीक्स एक्सपर्ट हार्डीने महिलेला सांगितलं की, तिची अंगठी फारच महागडी आहे. जे ऐकून जोआना हैराण झाली. जोआना म्हणाली की, बरं झालं की, तिने सॉक्स वॉशिंग मशीनमध्ये टाकला नाही. 

अ‍ॅंटीक एक्सपर्टने जेव्हा महिलेला विचारलं की, तुम्हाला ही अंगठी कशी मिळाली? तर महिलेने सांगितलं की, 'ही अंगठी माझ्या आईची होती. आम्हाला विश्वास आहे की, ही तिला तिच्या पंजोबाने दिली असेल. घरात साफसफाई करताना कपाटातील एका सॉक्सवर नजर गेली. त्यात ही अंगठी सापडली.

ही अंगठी जोआनाने पाहिली. ती 1915 मध्ये प्लॅटिनमपासून तयार करण्यात आली होती. जोआना म्हणाली की, अंगठी फार सुंदर आहे. तसेच अंगठी 4 कॅरेटच्या हिऱ्यात फार सुंदर दिसते. 

जोआनाला समजलं की, अंगठी बरोबर केल्यावर या अंगठीला लिलावात 20 लाख रूपये किंमत मिळू शकते. आता जोआना लवकरच या अंगठीचा लिलाव करणार आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स