शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मॉलबाहेर असलेल्या बेघर व्यक्तीच्या प्रेमात पडली तरूणी, घरी आणलं लग्न केलं आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 11:40 IST

Love Story : ही कहाणी एखाद्या परीकथेसारखी आहे. ज्यात एखादा देवदूत एखाद्या व्यक्तीचं नशीब बदलून टाकतो. मॅकॉली मर्ची नावाच्या बेघर व्यक्तीसाठी ही देवदूत ठरली जॅस्मिन ग्रोगन.

Love Story : आतापर्यंत तुम्ही अनेक लव्हस्टोरीज (Love Story) पाहिल्या असतील, ऐकल्या असतील आणि वाचल्या असतील. पण एका कॅमेडिअन तरूणीने तिची सांगितलेली लव्हस्टोरी केवळ एखाद्या सिनेमातच बघायला मिळू शकते. जॅस्मिन ग्रोगन (Jasmine Grogan) असं या तरूणीचं नाव आहे. तिने तिची लव्हस्टोरी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितली तेव्हा सगळेच हैराण झाले. जॅस्मिनने ज्या व्यक्तीसोबत लग्न केलं, तो तिला रस्त्यावर बेघर असलेला आढळला होता. त्याला बघताच जॅस्मिन त्याच्या प्रेमात पडली आणि दोघांनी नंतर लग्नही केलं.

ही कहाणी एखाद्या परीकथेसारखी आहे. ज्यात एखादा देवदूत एखाद्या व्यक्तीचं नशीब बदलून टाकतो. मॅकॉली मर्ची नावाच्या बेघर व्यक्तीसाठी ही देवदूत ठरली जॅस्मिन ग्रोगन. तिने त्याचं नशीब तर बदललंच सोबतच लग्न केलं आणि दोन मुलंही दिली.

Mirror च्या रिपोर्टनुसार, जॅस्मिन आणि मॅकॉलीच्या प्रेमाची सुरूवात एका मॉलच्या बाहेर झाली होती. ती काही साहित्य खरेदी करण्यासाठी मॉलमध्ये गेली होती. तेव्हा तिला एक बेघर व्यक्ती दिसली. तिने त्याला काही पैसे देऊ केले, पण त्याने घेण्यास नकार दिला. जॅस्मिन शॉपिंग दरम्यान याबाबत विचार करत राहिली. जेव्हा ती साहित्य घेऊन बाहेर आली तेव्हा त्या बेघर व्यक्तीने तिला सामान गाडीत ठेवण्यास मदत केली. त्या रात्री ती त्याला डीनरला घेऊन गेली आणि त्याच्या आयुष्याबाबत ते बोलले.

इतकंच नाही तर जॅस्मिनने त्याला एक नवीन फोन घेऊन दिला जेणेकरून दोघांना बोलता यावं. तसेच त्याला एका हॉटेलमध्ये रूमही दिली. काही दिवस बोलल्यानंतर ते डेटला गेले. जॅस्मिनने त्याला नवीन कपडे दिले. हळूहळू त्यांच्या भेटीचा सिलसिला वाढला आणि दोघेही प्रेमात पडले.

जसजसे मॅकॉली आणि जॅस्मिन भेटायलला लागले. त्यांचं नातं पुढच्या लेव्हलला जात गेलं. त्याला नंतर नोकरी लागली आणि मग त्याने जॅस्मिनला प्रपोज केलं. जॅस्मिनने होकार दिल्यावर त्यांनी लग्न केलं आणि त्यांना आता दोन मुले आहेत. जॅस्मिन या नात्याने फार  आनंदी आहे. ती म्हणाली की, ती मॅकॉली शिवाय जीवनाचा विचारही करू शकत नाही. तिची ही लव्हस्टोरी लोकांना खूप आवडत आहे. आतापर्यंत त्यांचा व्हिडीओ ७० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय. 

टॅग्स :AmericaअमेरिकाLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया