शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

एका मेसेजमुळे झालं पतीच्या अफेअरचा खुलासा, नंतर पत्नीने केलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 10:05 IST

या महिलेचं नाव चॅरिटी क्रेग आहे. ती 45 वर्षांची आहे आणि अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये राहते. तर तिचा पती मॅट 40 वर्षाचा आहे.

एका महिलेने सांगितलं की, तिने तिच्या पतीला दगा देताना पकडलं. ती त्याच्यापासून 8 महिने वेगळीही राहिली. पण त्यानंतर त्यांचा संसार वाचला. ती आणि तिचा पती एकमेकांच्या अधिक जवळ आले. या महिलेचं नाव चॅरिटी क्रेग आहे. ती 45 वर्षांची आहे आणि अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये राहते. तर तिचा पती मॅट 40 वर्षाचा आहे.

चॅरिटीने तिच्या पतीचा फोन चेक केला तेव्हा तिला काही महिलांचे मेसेज दिसले. ही घटना 2012 मधील आहे. यानंतर दोघेही वादामुळे काही महिने वेगळे राहिले. मॅटने एका तरूणीसाठी आपला परिवार सोडला. 

चॅरिटी एका ज्वेलरी कंपनीची संस्थापक आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, ती सांगते की, त्यांना वाटत होतं की, त्यांचं विश्व संपलं आहे. पती कॉलेजपासून सोबत होता.

20 वर्षाच्या वयात त्यांनी लग्न केलं. पण जेव्हा 2012 मध्ये पतीच्या अफेअरबाबत समजलं तेव्हा 6 वर्षापेक्षा कमी वयाची चार मुले होती. चॅरिटीला जुलै 2012 मध्ये पतीवर संशय आला. कारण तो रात्री उशीरापर्यंत बाहेर राहत होता.

जेव्हा तिने पतीला याबाबत विचारलं तेव्हा त्याने स्वीकार केलं की, त्याचं एका तरूणीसोबत अफेअर आहे. तेव्हाच तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला. चॅरिटी पतीपासून वेगळी राहू लागली. हे असं आठ महिन्यांपर्यंत चालू राहिलं.

यादरम्यान त्यांनी काउन्सेलिंग केली. त्याला समजलं की, जशी ती आधी होती तशी आता नाही. तरीही दोघांनी संसार टिकवण्यासाठी एक संधी घेतली. नातं आणखी मजबूत झालं. फेब्रुवारी 2013 पुन्हा एकदा नात्याची सुरूवात केली. आपली अडचण सांगत मॅटने सांगितलं की, तो आठवड्यातून 60 तास काम करतो. 

परिवार म्युझिकल करिअरमध्ये अडकला आहे. नात्याची सुरूवात पुन्हा झाल्यावर पत्नीला सोशल मीडियाचे सगळे पासवर्ड दिले. सोबतच माफीही मागितली. आता चॅरिटी एका मॅरेज काउन्सेलर म्हणून काम करते. इतर कपल्सची ती मदत करते. ती दुसऱ्यांचे लग्न तुटण्यापासून वाचवते. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल