शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
5
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
6
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
7
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
8
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
9
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
10
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
11
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
12
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
13
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
14
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
15
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
16
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
17
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
18
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
19
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
20
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...

प्रियकरासाठी पतीला सोडू का? पत्नीनं ChatGPT विचारला प्रश्न अन् आश्चर्यकारक उत्तर मिळालं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 18:02 IST

Woman Asked Question From ChatGPT: एका विवाहित महिलेचं दुसऱ्या एका पुरुषावर प्रेम जडलं. सहा महिने अफेअरमध्ये राहिल्यानंतर आता प्रियकरासोबत राहावं की पतीसोबतच राहावं या संभ्रमात ती पडली होती.

Woman Asked Question From ChatGPT: एका विवाहित महिलेचं दुसऱ्या एका पुरुषावर प्रेम जडलं. सहा महिने अफेअरमध्ये राहिल्यानंतर आता प्रियकरासोबत राहावं की पतीसोबतच राहावं या संभ्रमात ती पडली होती. आता याचं उत्तर मिळवण्यासाठी महिलेनं चक्क आर्टिफिशियल इंटेलिजन्स अॅपची मदत घेतली. तिने ChatGPT ला विचारलं - मी माझ्या प्रियकरासाठी माझ्या पतीला सोडू का? यावर AI ने दिलेले उत्तर जाणून तुम्हीही थक्क व्हाल.

सध्या आर्टिफिशियल इंटेलिजेंससाठी ChatGPT ची जोरदार चर्चा आहे. हा असा चॅटबॉट आहे, ज्यानं लोकांच्या प्रश्नांची अचूक उत्तरं दिल्यानं मनं जिंकली आहेत. यामुळेच चॅटजीपीटी लवकरच इंटरनेट यूझर्समध्ये खूप लोकप्रिय झाले आहे. यातच जेव्हा ३७ वर्षीय सारा नावाच्या विवाहित महिलेनं ChatGPT ला विचारलं की तिने तिच्या प्रियकरासाठी आपलं ५ वर्षांचं लग्न मोडायचं का? यावर चॅटबॉटने दिलेले उत्तर लक्षवेधी ठरलं. 

टेक सेक्टरमध्ये काम करणाऱ्या साराच्या म्हणण्यानुसार, ती विवाहित लोकांसाठी डेटिंग अॅप वापरत होती. त्यावर तिची एका व्यक्तीशी मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं. गेल्या सहा महिन्यांपासून तिचं या  पुरुषासोबत अफेअर होतं. ती सांगते की तिला ChatGPT बद्दल माहिती होती. मग तिनं विचार केला की चॅटबॉटच्या मदतीनंच आपण आपला गोंधळ का दूर करू नये. मग तिनं चॅटबॉटला तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारला.

...आणि तिनं पतीला सोडण्याचा घेतला निर्णयमिररच्या रिपोर्टनुसार, साराने चॅटबॉटला विचारलं की- आपलं अयशस्वी लग्न सोडून आपल्यावर प्रेम करणाऱ्यासोबत जीवन जगण्याला प्राधान्य द्यावं का? महिलेचं म्हणणं आहे की तिने अॅपला आपल्या आयुष्यातील सद्य परिस्थितीवर कथा लिहिण्यास सांगितलं होतं. साराच्या मते, तिचा अनुभव आश्चर्यकारक होता. ती म्हणते की माझ्या समस्यांबद्दल बोलण्याबरोबरच चॅटजीपीटीने तिच्या आनंदाचाही विचार केला. चॅटबॉटनं तिला उत्तर दिलं की आपण आपल्या आनंदाला प्राधान्य द्यायला हवं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे साराने चॅटबॉटचा सल्ला स्वीकारला आणि आपल्या पतीला घटस्फोट दिला.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके