शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
3
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
4
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
5
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
6
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
7
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
8
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
9
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
10
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
11
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
12
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
13
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
14
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
15
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
16
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
17
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
18
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
19
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
20
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  

बाबो! मुलीच्या बॉयफ्रेन्डसोबत रोमान्स करत होती महिला, पोलखोल झाल्यावर आला मोठा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 12:54 IST

Weird News : एका तरूणीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक अशी पोस्ट शेअर केली, जी वाचून लोक हैराण झालेत. आता या पोस्टची सोशल मीडिया यूजर्समध्ये चर्चा रंगली आहे.

प्रेमही अजब भावना कधी कुणावर जडेल काही सांगता येत नाही. अनेकदा प्रेमात लोकांचं आयुष्य आनंदमय होऊन जातं. पण कधी कधी नाती बिघडतात आणि वाद इतक्या टोकाला पोहोचतो की, तुम्ही कल्पनाही करू शकत नाहीत. एका तरूणीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक अशी पोस्ट शेअर केली, जी वाचून लोक हैराण (Weird News) झालेत. आता या पोस्टची सोशल मीडिया यूजर्समध्ये चर्चा रंगली आहे.

डेली स्टारच्या एका रिपोर्टनुसार, तिचा बॉयफ्रेन्ड आणि तिच्या आईने जे केलं त्याने नात्याला काळिमा फासली गेली. तरूणीने सांगितलं की, ती जेव्हा १७ वर्षांची होती तेव्हा तिची भेट एका २१ वर्षीय तरूणासोबत झाली होती. पहिल्या नजरेत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर तिचा बॉयफ्रेन्ड नेहमीच तिच्या घरी येत-जात होता. इतकंच नाही तर अनेकदा तर तो तिच्या घरी मुक्कामही करायचा. 

अशात तरूणाची तरूणीच्या आईसोबत जवळीक वाढत होती. दोघे खूप गप्पा मारायचे आणि मस्ती करायचे. तरूणी म्हणाली की, त्यावेळी ती लहान होती म्हणून तिने तेवढं काही लक्ष दिलं नाही. एक दिवस तिची आई आणि तिचा बॉयफ्रेन्ड किचनमध्ये भांडी घासत होते. जेव्हा तरूणी तिथे पोहोचली तेव्हा थक्क झाली, कारण दोघेही फार जवळ होते.

धक्कादायक सत्य आलं समोर

आपल्या आईला बॉयफ्रेन्डच्या इतक्या जवळ पाहून तरूणीला धक्का बसला. जेव्हा तिने याबाबत आईला विचारलं तर आई उलट तिला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत होती आणि दुसऱ्या दिवशी मनोरूग्ण तज्ज्ञांकडे घेऊन गेली. हे इथंच थांबलं नाही तर काही महिन्यांनी तरूणीने पाहिलं की, तिचा बॉयफ्रेन्ड आणि तिची आई रूममधून खाली कारमध्ये जात होते. यावेळीही तरूणीला वाटलं की हा तिचा भ्रम आहे आणि तिने दुर्लक्ष केलं. 

एक दिवस ती तिच्या परिवारासोबत डीनरला जात होती तेव्हा बॉयफ्रेन्डच्या फोनमध्ये तिने आईचे अश्लील मेसेज पाहिले. ज्यानंतर तरूणी खूप भडकली आणि तिने याबाबत तिच्या वडिलांना सांगितलं. सत्य जाणल्यावर तिच्या वडिलांनाही धक्का बसला. अशात तरूणीची आई मुलीच्या बॉयफ्रेन्डसोबत पळून गेली. नंतर समजलं की, तिची आई प्रेग्नेंट आहे आणि दोघांना साखरपुडाही केला. हे सत्य जाणून घेतल्यावर सगळेच हैराण झाले.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके