शहरं
Join us  
Trending Stories
1
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
2
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
3
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
4
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
5
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
6
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
7
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
8
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
9
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
10
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
11
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
12
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
13
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
14
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
15
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
16
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
17
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
18
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
20
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?

पतीच्या सततच्या टोमण्याला कंटाळून पत्नीने शिकवला धडा, दातांनीच तोडला त्याच्या जीभेचा लचका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 16:49 IST

Uttar Pradesh : ही घटना शीशगढ भागातील बल्ली गावातील आहे. पीडित श्रीपाल मौर्यने एक वर्षाआधी बिहारमधील एका तरूणीसोबत लग्न केलं होतं.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बरेलीमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने दातांनी तिच्या जिभेचा लचका तोडला. या घटनेनंतर पीडित व्यक्तीला बरेलीच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्याची स्थिती गंभीर आहे. असं सांगितलं जात आहे की, पती पत्नीला ती बोलू शकत नसल्याने मुकी असल्याचा सतत टोमणा मारत होता. ज्यानंतर रागाच्या भरात पत्नीने पतीच्या जीभेचा तिच्या दातानेच लचका तोडला.

ही घटना शीशगढ भागातील बल्ली गावातील आहे. पीडित श्रीपाल मौर्यने एक वर्षाआधी बिहारमधील एका तरूणीसोबत लग्न केलं होतं. तरूणाची पत्नी दिव्यांग आहे जी बोलू शकत नाही. ज्यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत होते. श्रीपाल आपल्या पत्नीवर यावरून नेहमीच टोमणे मारत होता.

बुधवारी सायंकाळी मजुरी करून आल्यावर थकव्यामुळे लवकर झोपला होता. तेव्हाच पत्नीने दातांनी त्याच्या जिभेचा तुकडा पाडला. ज्यानंतर तो रक्ताने माखला होता. तो जोरात ओरडल्याने घरातील लोक आणि आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यांनीच त्याला एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. जिथे त्याची स्थिती गंभीर आहे. या घटनेची पोलिसात तक्रार दिली गेली नाही. पण सध्या या विषयाची चर्चा परिसरात रंगली आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटके