शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पती घरातील धुणी-भांडी करतो म्हणून पत्नीने मागितला घटस्फोट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 14:54 IST

नवरा घरातील कामांमध्ये मदत करत नाही म्हणून वैतागलेल्या अनेक बायका तुम्ही पाहिल्या असतील. पण या जगात अशीही एक पत्नी आहे जी पतीच्या घरातील सगळी कामे आवरण्याच्या सवयीमुळे वैतागलेली आहे.

कैरो - नवऱ्याने घतकामात मदत करावी. ऑफीसमधून येताना बाजारातून भाजीपाला, किराणासामान घेऊन यावे, अशी प्रत्येक पत्नीची अपेक्षा असते. नवरा घरातील कामांमध्ये मदत करत नाही म्हणून वैतागलेल्या अनेक बायका तुम्ही पाहिल्या असतील. पण या जगात अशीही एक पत्नी आहे जी पतीच्या घरातील सगळी कामे आवरण्याच्या सवयीमुळे वैतागलेली आहे. तिचा नवरा तिला घरातील एकही काम करू देत नाही. नवऱ्याच्या या सवयीमुळे वैतागलेल्या महिलेले चक्क घटस्फोट मागितला आहे. हे प्रकरण इजिप्तमधील आहे. येथील समर एम. नावाच्या 28 वर्षीय महिलेला तिचा पती घरातील एकही काम करू देत नाही. तो घरातील धुणी-भांडी करण्यापासून साफसफाई करण्यापर्यंत सगळी कामे करतो. एवढंच नाहीतर जेवणही बनवतो. त्यामुळे ही महिला वैतागली आहे. त्यामुळे विवाहाला दोन आठवडे होण्याच्या आतच तिने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. समर हिच्या पतीचे स्वत:चे कपड्यांचे दुकान आहे. मात्र स्वत:चा व्यवसाय सांभाळून तो घरकाम आवरतो.  अल अरेबिया या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार समर सांगते की तिचा पती तिला घरातील कोणतेही काम करू देत नाही. त्यामुळे ती घरात कंटाळते. ती सांगते माझा पती जेवण बनवतो. कपडे धुतो, तसेच घरातील साफसफाईसुद्धा करतो. पतीच्या या विचित्र वागण्याला वैतागून समर हिने इजिप्तची राजधानी असलेल्या कैरोमधील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. घटस्फोटासाठी केलेल्या अर्जात ती लिहिते. "माझा पती मला घरात काम करण्याचे स्वातंत्र्य देत नाही. त्यामुळे मी एखाद्या हॉटेलमध्ये राहत असल्यासारखे मला वाटते. मी एक गृहिणी आहे. त्यामुळे अशाप्रकारे जगण्याचा मला कंटाळा आला आहे. आमच्या विवाहाला केवळ दोन आठवडेच झाले आहेत. मात्र माझे पती मला वेळ देण्याऐवजी घरकामामध्येच गुंतलेले असतात. कधीकधी ते जेवण बनवत राहतात. नाहीतर कपडे धूत राहतात."ती पुढे लिहिते."नवऱ्याच्या अशा वागण्यामुळे मला दिवसभर त्यांना काम करताना पाहुनच दिवस ढकलावा लागतो. त्यांचे दुकान आहे. मात्र दुकानात अनेक कामगार असल्याने ते दिवसातील बराच वेळ घरीच असतात." 

टॅग्स :Courtन्यायालयDivorceघटस्फोट