शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

Love Story : ४ वर्षाने लहान असलेल्या भावाच्या प्रेमात पडली विधवा बहीण, कुटुंबियांनी बोलवली पंचायत आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 17:11 IST

Widow Sister Fell in Love With Brother : प्रेयसी ही प्रियकरापेक्षा ४ वर्षाने मोठी आहे. महिलेच्या पतीचं निधन गेल्यावर्षी नदीत बुडून झालं होतं.

बिहारमधून (Bihar) एक अजब प्रेम कहाणी (Love Story) समोर आली  आहे. पश्चिम चंपारण जिल्ह्यातील विधना बहीण तिच्या लहान भावाच्या प्रेमात (Widow Sister Fell in Love With Brother) पडली. दोघे असे काही प्रेमात पडले त्यांनी वेगळे राहण्यास नकार दिला. दोघांना एकत्रच जगायचं आणि मरायचं होतं. पण कुटुंबियांनी आणि समाजाने त्यांचं हे प्रेम नाकारलं. कुटुंबियांनी दोघांना शिक्षा देण्यासाठी पंचायत बोलवली. ज्यानंतर प्रेमी युगुलाने पोलीस स्टेशनकडे सुरक्षेची मागणी केली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर दोघांना स्थानिकांपासून सोडवण्यात आलं. पोलीस म्हणाले की, लग्न करणं हा व्यक्तिगत भाग आहे आणि त्यात चुकीच्या पद्धतीने हस्तक्षेप करणं योग्य नाही. कुणी कायदा हाती घेतला तर कारवाई केली जाईल. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भाऊ-बहिणीच्या प्रेमाची ही घटना बेतियाच्या बानुछापार भागातील आहे. महिलेच्या पतीचं साधारण १ वर्षाआधी निधन झालं होतं. त्यानंतर ती ४ वर्षाने लहान मावस भावाच्या प्रेमात पडली. दोघांनी सोबत आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. पण कुटुंबियांनी हे नातं नाकारलं. त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकले नाहीत. अशात त्यांनी पंचायत बोलवली. इथे त्यांचं टक्कल करून गावातून धिंड काढण्याचं ठरलं. मात्र, प्रेमी युगुलाने वेळीच पोलिसांना याची सूचना दिली.

'दैनिक जागरण'च्या वृत्तानुसार, पोलीस येताच या प्रकरणाला वेगळं वळणं मिळालं. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून प्रेमी युगुलाची सुटका केली. त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिकांना समजावलं की, सर्वांना कायद्यानुसार लग्न करण्याचा अधिकार आहे. सोबतच इशारा दिला की, कुणी त्यांना त्रास दिला तर कायदेशीर कारवाई केली जाईल.

प्रियकर सुनील कुमार म्हणाला की, दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि त्यांना लग्न करायचं आहे. सुनीलने सांगितलं की, त्यांचे कुटुंबिय या नात्याने आनंदी नाही आणि ते लग्नाला विरोध करत आहेत. ते प्रेयसीने सांगितलं की, ते दोघेही लग्न करतील. प्रेयसी ही प्रियकरापेक्षा ४ वर्षाने मोठी आहे. महिलेच्या पतीचं निधन गेल्यावर्षी नदीत बुडून झालं होतं. 

टॅग्स :BiharबिहारLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टJara hatkeजरा हटके