शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

वॉश बेसिनमध्ये 'या' छोट्या छिद्राचं रहस्य काय? रोज बघत असाल पण माहीत नसेल याचं काम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 12:38 IST

Interesting Fact : एखाद्या वस्तूमध्ये एखादी खास किंवा शुल्लक वाटणारी गोष्ट का असते? हे जाणून घेण्याचा प्रयत्नच केला जात नाही. अशाच एका रोज वापरल्या जाणाऱ्या वस्तूबाबत आपल्याला सांगणार आहोत.

Interesting Fact : रोज आपल्या डोळ्यांसमोरून कितीतरी गोष्टी जात असतात....कित्येक नवीन किंवा जुन्याच म्हणजे माहीत असलेल्या गोष्टी दृष्टीस पडतात. रोजच्याच गोष्टी असल्याने त्यांकडे आपण फारचं काही खास लक्ष देत नाही. पण जर या गोष्टी बारकाईने पाहिल्या तर कळतं की, रोज वापरल्या जाणाऱ्या किंवा दिसणार्‍या वस्तूंच्या डिझाइनमध्ये अशा अनेक गोष्टी लपलेल्या असतात, ज्यांचा आपण कधी विचारही केलेला नसतो. सामान्य गोष्टी समजून आपण कानाडोळा करतो. एखाद्या वस्तूमध्ये एखादी खास किंवा शुल्लक वाटणारी गोष्ट का असते? हे जाणून घेण्याचा प्रयत्नच केला जात नाही. अशाच एका रोज वापरल्या जाणाऱ्या वस्तूबाबत आपल्याला सांगणार आहोत.

हल्ली जवळपास सगळ्याच घरांमध्ये वॉश बेसिन बघायला मिळतं. ज्याचा वापर रोज दिवसभर केला जातो. सकाळी ब्रश करण्यापासून ते हात धुण्यापर्यंत वेगवेगळ्या कामांसाठी वॉश बेसिनचा वापर केला जातो. पण हेच आपल्या वेगवेगळ्या कामात येणाऱ्या वॉश बेसिनला आपण कधी बारकाईने पाहिलंय का? जर पाहिलं असेल तर वॉश बेसिनच्या नळाखाली आपल्याला एक छोटं छिद्र दिसत असेल. आपण कधी विचार केलाय का की, बेसिनमध्ये हे छोटं छिद्र कशासाठी असतं? नसेल केला तर आज जाणून घेऊया त्याचं काम...

कशासाठी असतं हे छिद्र? 

अनेकांना वाटत असेल की, बेसिनमधील हे छिद्र बेसिनच्या डिझाइनचा भाग असेल. पण असं अजिबात नाहीये. खरंतर या छिद्राला ओव्हरफ्लो होल म्हटलं जातं. आता त्याचं काय काम असतं हे जाणून घेऊया. हे छिद्र एकप्रकारचं सेफ्टी फीचर असतं. जर चुकून नळ सुरू राहिला किंवा मुख्य ड्रेनमध्ये काही कचरा अडकला तर या छिद्रामुळे पाणी बेसिनच्या बाहेर येणार नाही. याच्या मदतीने अतिरिक्त पाणी पाइपच्या माध्यमातून थेट ड्रेनेज सिस्टीममध्ये जाईल.    

हवा पास करणे

वॉश बेसिनमधील या छोट्या छिद्राचं दुसरं काम म्हणजे हवा पास करणं. जेव्हा ड्रेनच्या छिद्रातून हवा निघत नाही तेव्हा पाणी हळूहळू सिंकमधून बाहेर पडतं. अशात या छिद्राच्या माध्यमातून हवा पास होते. हवा व्यवस्थित निघाल्यावर सिंक व्यवस्थित काम करतं. इतकंच नाही तर बाथटबमध्ये देखील असं एक छोटं छिद्र असतं. त्यालाही ओव्हरफ्लो होल असं म्हणतात.  

प्लास्टिक स्टूलमध्ये का असतं छिद्र?

प्लास्टिकच्या स्टूलमध्ये छोटं छिद्र असण्याला काही खास उद्देश आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे प्रेशर आणि व्हॅक्यूम पास करणं. स्टूल घरातील जास्त जागा घेत नाहीत, ते एकावर एक ठेवता येतात. जेव्हा त्यावर बसायचं असतं तेव्हा ते वेगळे केले जातात. अशात जर त्यांमध्ये छिद्र नसेल तर स्टूल एकावर एक ठेवल्यानं प्रेशर आणि व्हॅक्यूममुळे आपसात फसतात. ज्यामुळे त्यांना वेगळं करणं अवघड होतं. अधिक जोर लावावा लागतो. पण यात छिद्र असल्याने ते सहजपणे वेगळे करता येतात. हेच या छिद्राचं मुख्य काम असतं. पण याचे इतरही काही फायदे आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Washbasin's Little Hole: Unveiling its Purpose and Everyday Object Mysteries.

Web Summary : That little hole in your washbasin? It's an overflow drain, preventing floods. It also allows air to pass for smooth drainage. Plastic stools have holes to prevent vacuum lock, making them easier to separate. Simple designs, clever functions.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके