शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

रोलेक्सचं घड्याळ इतकं महागडं का असतं भौ? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 16:24 IST

सर्वात महागड्या घड्याळीचा विषय निघाला की, जास्तीत जास्त लोकांच्या डोळ्यांसमोर एकच नाव आधी येतं. ते म्हणजे रोलेक्स. रोलेक्स प्रत्यक्षात अनेकांनी बघितलेली नसते.

(Image Credit : rolex.com)

सर्वात महागड्या घड्याळीचा विषय निघाला की, जास्तीत जास्त लोकांच्या डोळ्यांसमोर एकच नाव आधी येतं. ते म्हणजे रोलेक्स. रोलेक्स प्रत्यक्षात अनेकांनी बघितलेली नसते. पण घड्याळांची आवड असणाऱ्यांना रोलेक्सची किंमत नक्कीच माहीत असते. तर अनेकांना असाही प्रश्न पडत असेल की, अखेर या रोलेक्सच्या घड्याळी इतक्या महाग का असतात?

(Image Credit : Social Media)

मुळात रोलेक्स घड्याळाची बांधणी ही सर्वोत्तम कारागिरीचा नमूना मानली जाते. कारण ही घड्याळ इतर घड्याळांप्रमाणे तयार केली जात नाही. या घड्याळाचं काम इतक्या बारकाईने केलं जातं की, याची किंमत लाखोंच्या घरात जाते. तसेच ही घड्याळं तयार करण्यासाठी स्पेशलल रिसर्च अ‍ॅन्ड डेव्हलप लॅब असतात.  

(Image Credit : Social Media)

रोलेक्स घड्याळ तयार करण्यासाठी काही निवडक स्पेशालिस्ट्सकच निवडले जातात. यांचाच पगार कोट्यवधींच्या घरात असतो. तसेच या घड्याळाची आणखी एक खासियत म्हणजे या घड्याळांसाठी ९४० एल स्टील वापरलं जातं, जे फारच मजबूत असतं. सामान्य घड्याळांमध्ये ३४० किंवा त्यापेक्षा कमी एल स्टील वापरलं जातं. तसेच रोलेक्सचे पार्ट्स हे हाय टेक मशीनींद्वारे तयार करण्यात येतात.

(Image Credit : interestingengineering.com)

हे घड्याळ महाग असण्याचं आणखी एक कारण म्हणजे या घड्याळींच्या डायलमध्ये व्हाइट गोल्डचा वापर केला जातो. तसेच यात ज्या नंबर्सचा वापर केला जातो ते सुद्धा स्पेशल प्लॅटिनमपासून तयार केलेले असतात. 

(Image Credit : luxurylaunches.com)

कंपनीनुसार, रोलेक्सच्या घड्याळात पार्ट्स इतक्या बारकाईने लावण्यात येतात की, मोजणारे हैराण होतील. हे फारच काळजीपूर्वक लावावे लागतात. कारण ते लावताना खराब होण्याचाही धोका असतो. रोलेक्समध्ये ज्या मटेरिअलचा वापर होतो ते फार महागडं असतं. हे घड्याळ तयार करताना सोन्याचाही वापर केला जातो.

या घड्याळांची निर्मिती स्वित्झर्लॅंडमध्ये केली जाते. कंपनीकडून वर्षाला ८ ते १० लाख घड्याळांची निर्मिती केली जाते. या कंपनीने सर्वात पहिल्यांदा १९५३ मध्ये घड्याळ तयार केली होती.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके