Peg Size Size Facts : आपण दारू पित असाल किंवा पित नसाल तरी सुद्धा ऐकून आपल्याला हे माहीत असेल की, दारू ही नेहमी पेगमध्ये मोजली जाते. म्हणजे कुणी ६० मिलीचा पेग पितात, कुणी ३० चा पेग तर कुणी पटियाला पेग पितात. पण आपल्याला कधी प्रश्न पडलाय का की, दारू पेगमध्येच का मोजली जाते आणि पेगचं प्रमाण ३०, ६० किंवा ९० मिली अशीच का असते? नेहमीच पिणाऱ्या लोकांना सुद्धा याची कल्पना नसेल. त्यामुळे आज आम्ही या प्रश्नाचं उत्तर आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. मुळात याचा संबंध आपल्या आरोग्याशी असतो असं मानलं जातं. चला तर मग पाहुयात दारूचा एक पेग ६० मिलीचाच का असतो?
पेग ६० मिलीचाच का असतो?
अनेकांना हे माहीत असेल की, जेव्हा आपण दारू घेतो किंवा अल्कोहोल घेतो, तेव्हा आपलं पोट आणि छोटी आतडी अल्कोहोल वेगाने अब्जॉर्ब करते. त्यानंतर दारू रक्तात मिक्स होते. अल्कोहोल हे शरीरासाठी घातक असतं, यामुळे लिव्हर, किडनी डॅमेज होतात. जेव्हा आपण लिव्हरची अल्कोहोल पचवण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वेगाने दारू पितो, तेव्हा ब्लड अल्कोहोल लेव्हल अधिक वाढते. ज्यामुळे नशा येते. सामान्यपणे आपलं लिव्हर १ तासात जवळपास ६० मिली पर्यंतचा पेग पचवू शकतं. हे अल्कोहोल साधारणपणे १२ औंस बिअर, ५ औंस वाइन इतक्या प्रमाणात असू शकतं. म्हणजे एका तासात जर आपण १ पेग पित असाल तर ते लिव्हर सहजपणे पचवू शकतं. ६० मिलीपेक्षा जास्त दारू घेतल्यास शरीरावर अल्कोहोलचा ताण पटकन वाढतो. लिव्हर एका वेळी मर्यादित प्रमाणातच अल्कोहोल प्रक्रिया करू शकतं. त्यामुळे ६० मिली हे 'तुलनेने सुरक्षित' मानलं जाणारं प्रमाण म्हणून रूढ झालं.
जगभरात दारू पिण्याच्या प्रमाणासाठी Standard Drink ही संकल्पना आहे. ४०–४२% अल्कोहोल असलेल्या दारूचा 60 मिली पेग घेतल्यास शरीरात जाणाऱ्या अल्कोहोलचे प्रमाण साधारण नियंत्रित राहते. यामुळे नशेचा अंदाज लावणे सोपे जाते आणि ओव्हरड्रिंकिंग टाळण्यास मदत होते.
काय आहे पेगचा अर्थ?
पेग हा शब्द परदेशातून आपल्याकडे आला आहे. हा शब्द मूळ लंडनमधून आला. लंडनचं वातावरण फारच थंड असतं. त्या काळात खाण कामगारांना काम संपले की खाण मालक एक ग्लास दारू देत असे. कामाचा स्ट्रेस निघून जाण्यसाठी हा दारूचा ग्लास त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा असे. हेच कामगार त्या दारुच्या ग्लासाला PRECIOUS EVENING GLASS असे म्हणत असे. याच शब्दाचे संक्षिप्त रूप P.E.G. हे आहे. त्यानंतर हा शब्द सर्वत्र पोहोचला आणि दारूच्या ग्लासला पेग असं म्हटलं जाऊ लागलं.
पटियाला पेगचा जन्म
'पटियाला पेग' या शब्द पटियालाचे महाराजा भूपिंदर सिंह यांची देण आहे. त्यांनी १९२० मध्ये हा शब्द वापरला. ब्रिटिशांसोबत झालेल्या एका क्रिकेट सामन्यात महाराजांनी ब्रिटिशांना मात दिली होती. त्या सामन्यादरम्यान 'पटियाला पेग'चा जन्म झाला.
Web Summary : A standard 60ml alcohol peg is considered relatively safe because the liver can process it in an hour. Larger amounts increase blood alcohol levels faster. The term 'peg' originated in London, while 'Patiala Peg' comes from Maharaja Bhupinder Singh.
Web Summary : एक मानक 60 मिलीलीटर शराब का पेग अपेक्षाकृत सुरक्षित माना जाता है क्योंकि लिवर इसे एक घंटे में संसाधित कर सकता है। अधिक मात्रा में पीने से ब्लड अल्कोहल का स्तर तेजी से बढ़ता है। 'पेग' शब्द लंदन से आया है, जबकि 'पटियाला पेग' महाराजा भूपिंदर सिंह से।