शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात नवरदेव घोडीवरच का बसतात, घोड्यावर का नाही? जाणून घ्या अजब कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 14:49 IST

Interesting Facts : याचं कारण काय आहे? खरंतर सगळ्यांना घोडीवर बसून स्टाईल मारायची घाई असते कारण कशाला कुणी शोधत बसणार ना...पण आज आम्ही तुम्हाला यामागचं कारण सांगणार आहोत.

Interesting Facts : लग्न म्हटलं की, आजकाल सगळेच नवरदेव घोडीवर बसून येतात. म्हणजे आता तर असं झालंय की, घोडीवर बसून येणं फॅशन झाली आहे. वरातीला घोडी असल्याशिवाय नवरदेव बाहेरच येत नाही. पण कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का की, लग्नात नवरदेव घोडीवर बसूनच का येतात? किंवा याचं कारण काय आहे? खरंतर सगळ्यांना घोडीवर बसून स्टाईल मारायची घाई असते कारण कशाला कुणी शोधत बसणार ना...पण आज आम्ही तुम्हाला यामागचं कारण सांगणार आहोत.

Quora नुसार, घोड्यांना हिंदू संस्कृतीमध्ये फार महत्व आहे. मग तो अश्वमेध यज्ञ असो वा कृष्णाकडून अर्जूनाचा रथ चालवणं असो घोड्यांचं महत्व वेळोवेळी बघायला मिळतं. तसेच राजा म्हटले की घोडा असणारच हे समीकरणच होतं. पण घोडा चालवण्याचा थेट अर्थ असा आहे की, घोडा चालवणाऱ्या व्यक्तीने आता बालपणाचा त्याग केलाय आणि ती व्यक्ती भरपूर जबाबदाऱ्या असलेल्या जीवनाच्या नव्या अध्यायाला सुरूवात करणार असते.

याचं आणखी दुसरं कारण असं सांगितलं जातं की, प्राचीन काळात जेव्हा लग्ने होत होती तेव्हा नवरीसाठी किंवा आपल्या शौर्याचं प्रदर्शन करण्यासाठी लढाई केली जात होती. शास्त्रात असे अनेक प्रसंग वाचायला मिळतात जेव्हा नवरदेवाला नवरीसाठी लढाई करावी लागली.एका दुसऱ्या रिपोर्टनुसार, नवरदेव घोड्याऐवजी घोडीवर बसतात कारण घोडी जास्त चंचल असते आणि त्यांना वशमध्ये करणं म्हणजेच कंट्रोल करणं कठिण असतं. काही इतर मान्यतांनुसार, घोडी बुद्धीमान, दक्ष आणि चलाख प्राणी आहे. घोडीला कंट्रोल करणं या गोष्टीचं प्रतीक मानलं जातं की, नवरदेव आता परिवाराची धुरा सांभाळू शकतो.

Yahoo च्या एका रिपोर्टनुसार, जास्तीत जास्त पंजाबी लग्नांमध्ये घोडीला सजवलं जातं आणि तिच्या शेपटीवर मोली बांधली जाते. तर नवरदेवाची बहीण घोडीला चणे खाऊ घालते. पूर्वी उत्तर भारतातील किंवा पंजाबातील लग्नांमध्येच घोडीचा वापर केला जात होता. पण आता तर देशातील सगळ्याच लग्नात नवरदेव घोडीवर बसून वरात काढतो.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके