शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
5
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
6
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
7
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
8
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
9
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
10
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
11
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
12
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
13
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
14
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
15
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
16
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
17
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
18
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
19
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
20
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर

जरा डोक खाजवा! कोल्डड्रिंकच्या बाटलीचा तळ का नसतो सपाट? आहे एक रंजक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 14:29 IST

तुम्ही कधी कोल्डड्रिंक किंवा सोड्याच्या बाटलीकडं (Bottle) लक्षपूर्वक पाहिलं असता तिचा आकार वैशिष्टपूर्ण असा का असतो, सर्वसामान्य बाटलीसारखी का नसतो, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?

सध्या हिवाळा जरी सुरु असला तरीही तरुणाईमध्ये कोल्डड्रिंकची क्रेझ आहे. अनेकजण पाण्याऐवजी जास्त कोल्डड्रिंकच पितात. पण तुम्ही कधी कोल्डड्रिंक किंवा सोड्याच्या बाटलीकडं (Bottle) लक्षपूर्वक पाहिलं असता तिचा आकार वैशिष्टपूर्ण असा का असतो, सर्वसामान्य बाटलीसारखी का नसतो, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?

कोल्ड्रिंक किंवा सोड्याची बाटली खरेदी केल्यानंतर या बाटलीच्या वैशिष्टपूर्ण आकारानं तुमचं लक्ष नक्कीच वेधलं असेल. कोणत्याही कंपनीच्या कोल्ड्रिंक किंवा सोड्याच्या बाटल्या खालच्या बाजूने एकसारख्या असतात. मात्र त्या तुलनेत पाण्याच्या बाटलीचा आकार मात्र वेगळा असतो. रिपोर्टनुसार हा आकार फक्त डिझाइन म्हणून नाही तर त्यामागे कारणही आहे.

कोल्ड्रिंकच्या बाटलीची खास गोष्ट म्हणजे, या बाटलीच्या खालील बाजूस म्हणजेच तळाशी पाच किंवा तीन बंप (Bump) असतात. ही बाटली कधीही सरळ किंवा फ्लॅट नसते. मात्र पाण्याच्या बाटलीसाठी खास डिझाईनची गरज नसते. कोल्ड्रिंकच्या बाटलीचा तळाचा भाग वैशिष्टयपूर्ण असण्यामागे महत्त्वाचे कारण असते ते म्हणजे गॅस.

ज्या कोल्ड्रिंक्समध्ये फिज असतो, त्याच्या बाटल्यांची रचनाही खास असते. खरं तर असं होतं की जेव्हा कोल्ड्रिंक थंड केलं जातं तेव्हा त्याचा व्हॉल्यूम सतत बदलत राहतो. तसेच त्यात गॅस असल्यानं बाटलीचा आकार विशेष पद्धतीनं डिझाईन केलेला असतो. ड्रिंकच्या व्हॉल्यूमनुसार (Volume) बाटली अ‍ॅडजेस्ट होते आणि गॅसचा दाबही सहज नियंत्रित केला जातो. या खास बाटलीला कोरुगेशन (corrugation) असंही म्हणतात. तसेच, कार्बोनेटेड असल्यानं बाटलीच्या तळाशी दाब निर्माण होतो.

कोल्ड्रिंकच्या बाटलीचं आणखी एक वेगळंपण म्हणजे या बाटलीचा खालील भाग हा तुलनेनं जास्त कडक असतो. बाटली क्रश (Crush) केल्यानंतर तिचा वरील भाग अगदी सहजपणे वाकडा होतो. पण खालचा भाग आहे तसा राहतो. बाटलीची वाहतूक करताना किंवा हाताळताना नुकसान होऊ नये, यासाठी सॉफ्ट ड्रिंकच्या (Soft Drink) बाटल्यांचं डिझाईन हे वैशिष्ट्यपूर्ण असतं.

 

 

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके