शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅटफॉर्म रिकामे असूनही स्टेशनच्या आधीच का थांबवली जाते रेल्वे? जाणून घ्या यामागचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 15:32 IST

Interesting Facts : आज आम्ही तुम्हाला रेल्वेशी संबंधित अशी एक माहिती सांगणार आहोत, जी कदाचित तुम्ही आधी कधी विचारही केली नसेल.

Interesting Facts : भारतात राहणारे जास्तीत जास्त लोक रेल्वेने प्रवास करतात. खासकरून मध्यमवर्गीय लोक सर्वाधिक प्रवास रेल्वेनेच करतात, कारण रेल्वेचे तिकीट तुलनेनं स्वस्त आणि बजेटमध्ये असतं. लांब अंतराच्या प्रवासासाठीही लोक रेल्वेचीच निवड करतात, कारण बसच्या तुलनेत रेल्वेमध्ये अधिक आराम मिळतो. एकूणच कारणे वेगवेगळी असली तरी जवळपास प्रत्येकाने आयुष्यात कधीतरी रेल्वेने प्रवास केलेलाच असतो. आज आम्ही तुम्हाला रेल्वेशी संबंधित अशी एक माहिती सांगणार आहोत, जी कदाचित तुम्ही आधी कधी विचारही केली नसेल.

आउटरवर का थांबते रेल्वे?

तुम्ही अनेक वेळा रेल्वेने प्रवास केला असेल. कधी रेल्वे वेळेवर येते, तर कधी उशिरा प्लॅटफॉर्मवर पोहोचते. रेल्वे उशिरा येत असेल तर प्रवाशांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की रेल्वे अजून का आली नाही. अशा वेळी बहुतेक वेळा उत्तर मिळते की रेल्वे आउटरवर थांबली आहे.

प्लॅटफॉर्म रिकामे असतानाही असे का होते?

लोकांच्या मनात लगेच प्रश्न येतो की इतके प्लॅटफॉर्म रिकामे असताना रेल्वेला आउटरवर का थांबवलं जातं? याचं कारण म्हणजे प्रत्येक स्टेशनवर विशिष्ट रेल्वेसाठी ठराविक प्लॅटफॉर्म निश्चित केलेला असतो. उदाहरणार्थ, समजा रेल्वे A आणि रेल्वे B या दोन्हींसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक ३ निश्चित आहे. जर त्या वेळी प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर रेल्वे B उभी असेल, तर रेल्वे A ला स्टेशनच्या बाहेर म्हणजे आउटर सिग्नलवर थांबावं लागतं, जरी प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ रिकामे असले तरी.

ही व्यवस्था रेल्वेच्या सिग्नलिंग, वेळापत्रक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी केली जाते. म्हणूनच कधी कधी प्लॅटफॉर्म रिकामे दिसत असले तरी ट्रेन आउटरवर थांबलेली असते. हे सर्व व्यवस्थापन Indian Railways च्या सिग्नलिंग आणि ऑपरेशन प्रणालीचा एक भाग आहे.   

रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर X का लिहितात?

भारतात धावणाऱ्या काही रेल्वेंच्या मागेच असा साइन असतो. पॅसेंजर रेल्वेंच्या मागे पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगात X हा साइन काढलेला असतो. हा साइन सुरक्षेच्या दृष्टीने सर्वच पॅसेंजर ट्रेनच्या मागे असणं गरजेचं आहे. हा नियम भारतीय रेल्वेनेच केला आहे. यासोबतच तुम्ही हे पाहिलं असेल की, काही रेल्वे डब्यांवर एलव्ही असंही लिहिलं असतं. सोबतच रेल्वेच्या मागे लाल रंगाचा लाइटही ब्लिंक करत असतो. रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर एलव्ही लिहिण्याचा अर्थ असा की, हा डबा रेल्वेचा शेवटचा डबा आहे. हा एलव्ही नेहमी X या साइनने लिहिला जातो.

English
हिंदी सारांश
Web Title : Why Trains Halt Before Stations Despite Empty Platforms: Explained

Web Summary : Trains often halt before stations due to platform allocation. Specific platforms are designated for particular trains, even if others are vacant. 'X' marks the last carriage for safety.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सIndian Railwayभारतीय रेल्वेJara hatkeजरा हटके