शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

वाघ पाण्यात तासंतास का बसतात? IFS अधिकाऱ्याने सांगितले कारण, ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 17:56 IST

अनेकदा वाघाशी संबंधित व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर येत राहतात, ज्यामध्ये तो कधी जंगलात फिरताना तर कधी शिकार करताना दिसतात.

वाघ अनेकदा पाण्यात बसलेले दिसतात. परंतु त्यामागील कारण काय आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी याचबाबत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यांनी त्यामागील वैज्ञानिक कारण स्पष्ट केले.

अनेकदा वाघाशी संबंधित व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर येत राहतात, ज्यामध्ये तो कधी जंगलात फिरताना तर कधी शिकार करताना दिसतात. तर काही व्हिडिओमध्ये वाघ बराच वेळ पाण्यात बसलेले दिसतात. बरेचदा लोक जंगल सफारीवर जातात ते प्राणी पाहण्यासाठी आणि त्यांना जवळून पाहण्यासाठी. अशा परिस्थितीत कधी-कधी वाघांचा कळप पाण्यात बसलेला दिसतो, पण त्यामागे काय कारण आहे याचा कधी विचार केला आहे का?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा (IFS सुशांत नंदा) यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून वाघाने असे करण्यामागील वैज्ञानिक कारण स्पष्ट करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये पाच वाघ पाण्यात आनंदाने बसून आराम करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये शिकारीला जाण्याचा बेत आखत असल्याचे दिसत आहे. 

व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'वाघ आणि पाणी एकमेकांसाठी बनलेले आहेत. वाघ सामान्यत: उष्ण हवामानात राहतात आणि विशेष संरचनेमुळे त्यांना लवकर गरम वाटू लागते. त्यांच्या शरीराच्या बहुतेक भागांमध्ये घाम ग्रंथी नसतात, म्हणून जेव्हा त्यांचे शरीर खूप गरम होते. त्यामुळे वाघ अनेक तास पाण्यात बसून राहणे पसंत करतात.

दरम्यान, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, वाघ शरीराचे तापमान राखण्यासाठी पाणवठ्यांमध्ये तासनतास बसतात. यासोबतच आणखी एक खास गोष्ट म्हणजे, वाघ हे उत्तम जलतरणपटू मानले जातात. ते एका वेळी ३० किलोमीटरपर्यंत पोहू शकतात.

अवघ्या २८ सेकंदांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, आतापर्यंत ३६ हजार वेळा पाहिला गेला आहे. तर १ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'निसर्ग नेहमीच सोबत घ्यायला शिकवतो आणि एकमेकांचे महत्त्व सांगतो.' दुसर्‍या युजरने लिहिले की,'वाघ अनेकदा रणथंबोर आणि मध्य प्रदेशच्या नॅशनल पार्कमध्ये असे करताना दिसतील'.

टॅग्स :TigerवाघWaterपाणीJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल