शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

डॉक्टरांचे अक्षर कोणालाच का कळत नाही? जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 17:35 IST

आपण दवाखान्यात वेगवेगळ्या कारणांसाठी  जात असतो.

आपण दवाखान्यात वेगवेगळ्या कारणांसाठी  जात असतो. अनेकदा  डॉक्टरांनी देलेले प्रिस्क्रिपशन आपल्याला समजण्यास कठीण जातं. काय लिहीलंय आपल्याला काही कळत नाही मग आपण मेडिकलवाल्या व्यक्तीला विचारतो.  ही गोळी कशाची आहे आणि किती वेळा घ्यायची आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का की डॉक्टरर्स अक्षर कधी कोणालाच का कळत नाही. असं ते कोणत्या सांकेतीक भाषेत लिहीत असतात की के कोणालाही कळतं नाही. असं अजिबात नसतं की खराब अक्षरं असणारे लोकं डॉक्टर असतात. आज आम्ही तुम्हाला डॉक्टरांच्या अशा अक्षरामागचं कारण सांगणार आहोत. तर मग जाणून घेऊया डॉक्टरर्स असं का लिहीतात. 

डॉक्टरांना खूप लिहावं लागतं

डॉक्टरांना रोजचं काम करत असताना खूप लिहावं लागतं असतं. फक्त तुमची औषध नाही तर अनेक रुग्णांच्या औषधाचं  प्रिस्क्रिप्शन लिहावं लागतं. मेडीकलच्या संदर्भातील प्रत्येक गोष्टी बारकाईने लिहाव्या  लागत असतात. 

ताण-तणावाचा दिवस

ताण-तणावाचा दिवस असल्यामुळे  एका दिवसात २५० ते ३००  रुग्णांना तपासणे. त्यांच्या लहानलहान गोष्टी लक्षात ठेवायच्या.  त्यांना अचुक औषध द्यायची तसंच त्यांना काही इमरजन्सी पेशंटसुध्दा पहावे लागतात.  त्यात जास्तवेळ बसून काम केल्यामुळे त्यांच्या हातांच्या मासंपेशी थकलेल्या अवस्थेत असतात. म्हणून डॉक्टरांचे अक्षर  कोणालाही समजण्यास कठिण जात असतं. 

डॉक्टर खूप घाईत असतात. 

डॉक्टरर्स खूप घाईत असतात. त्यांच्या कडे जास्त वेळ नसतो. एक गेल्यानंतर दुसरा पेशंट येत असतो त्यामुळे डॉक्टरांना  कमी वेळात पेशन्टचं योग्य  प्रिस्क्रिप्शन लिहायचं असतं म्हणून डॉक्टरर्स  आपल्या अक्षराकडे जास्त लक्ष देत नाहीत. कारण त्यांना  अक्षरापेक्षा जास्त काळजी पेपरवर लिहिल्या जात असेलेल्या प्रिस्क्रीपशनची असते. 

विशिष्ट शब्दावली डॉक्टरांच्या खराब अक्षरासाठी जबाबदार आहे. पण फार्मासिस्टसना डॉक्टरांनी लिहिलेल्या सगळ्या  शब्दाचे अर्थ बरोबर माहीत असतात.  अनेकदा गैरसमज होण्याची सुद्धा शक्यता असते. लिखाणात असलेल्या लहान लहान चुकांमुळे सुध्दा अर्थ बदलू शकतो. अनेक ठिकाणी हाताने लिहिलेले प्रिस्क्रीप्शन हे  बेकायदेशीर ठरवले जात आहे. २००६ च्या अहवालानुसार सुमारे ७००० लोकांचे मृत्यू  चुकीच्या प्रिस्क्रिप्शनमुळे झाले आहेत. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके